लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यानच्या हायप्रोफाईल वन-डे मालिकेतील कार्डिफमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात सट्टेबाजी व मैदानाची माहिती पुरविण्यात आल्याचे प्रकरण उघड झाले आहे. इंग्लंड अॅन्ड वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ईसीबी) भ्रष्टाचार विरोधी एजेंसीचे प्रमुख ख्रिस वॉट्स यांनी या वृत्ताला दुजोरा देताना म्हटले की, ‘दुसऱ्या वन-डे सामन्यादरम्यान स्वालेक स्टेडियममधील कर्मचाऱ्यांनी तिकीटांच्या नियमांचे उल्लंघन आणि स्टेडियमची माहिती पुरविण्याच्या संशय व्यक्त करताना एका व्यक्तीला स्टेडियम बाहेर पिटाळले होते. या व्यक्तीकडे मोबाईल व लॅपटॉप होता आणि भारताच्या डावादरम्यान ती व्यक्ती बाहेरच्या व्यक्तीला माहिती पुरवित असल्याचे निदर्शनास आले. या व्यक्तीच्या संशयास्पद वर्तनुकीनंतर त्याला स्टेडियमच्या बाहेर पिटाळण्यात आले. या घटनेनंतर उर्वरित तीन वन-डे सामन्यांदरम्यान ईसीबीच्या भ्रष्टाचार विरोधी समितीचे अधिकारी स्टेडियममध्ये उपस्थित राहतील, अशी आशा आहे. (वृत्तसंस्था)
कार्डिफ वन-डेवर होते सट्टेबाजांचे सावट
By admin | Updated: August 30, 2014 04:08 IST