नवी दिल्ली : ब्राझीलमधील आगामी फुटबॉल चषक स्पर्धेत वापरल्या जाणार्या ‘ब्राजुका’ या फुटबॉलमध्ये सहा एच. डी. कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्यामुळे मैदानातील घटना ३६० अंशांच्या कोनातून पाहायला मिळणार आहे. या बॉलचे डिझाईन निळ्या, हिरव्या आणि भगव्या रंगांत केले आहे. ब्राझीलच्या या खेळाप्रती असणार्या उत्साहाचे प्रतीक या फुटबॉलवर असणार आहेत. ब्राजुकाविषयी आदिदास इंडियाचे ब्रॅँड संचालक तुषार गोकुळ दास यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘फुटबॉलच्या घरात विश्वचषक स्पर्धेचे आयोजन होत आहे, यापेक्षा मोठी कोणतीही गोष्ट नाही.’ (वृत्तसंस्था)
विश्वचषक स्पर्धेत वापरणार कॅमेरा असलेला फुटबॉल
By admin | Updated: May 28, 2014 03:57 IST