न्यूयॉर्क : टेनिस कोर्टवर 'हिट' असलेली बॉब व माईक या ब्रायन बंधूंनी वर्षाच्या अखेरच्या ग्रॅण्ड स्लॅम यूएस ओपन स्पर्धेतही वर्चस्व गाजविले. ब्रायन बंधूंनी येथे पाचव्यांदा पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले. यासह या जोडीने एकूण १00 स्पर्धांमध्ये जेतेपद पटकाविण्याचा विक्रम नोंदविला आहे. अंतिम लढतीत अव्वल मानांकित ब्रायन बंधूने ११ व्या मानांकित स्पेनच्या मार्सेल ग्रॅनोलर्स व मार्क लोपेज या जोडीचा ६-३, ६-४ ने पराभव केला. या बंधूंचे हे १६ वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद आहे. (वृत्तसंस्था)
ब्रायन बंधूंना दुहेरीचे विजेतेपद
By admin | Updated: September 9, 2014 03:35 IST