नेमारच्या मणक्याला फ्रॅ क्चर : उर्वरित सामन्यांत खेळणो अशक्य
साओ पाऊलो : 12 वर्षानंतर ब्राझीलने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. तरीदेखील ब्राझीलवासीयांमध्ये पाहिजे तसे उत्साहाचे वातावरण नाही. कारण कोलंबियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीदरम्यान या संघाचा नेमाररुपी कणाच मोडला. कोलंबियाचा बचावपटू जुआन जुनिगा नेमारच्या अंगावर आदळल्यामुळे त्याचा मणका फ्रॅक्चर झाला आहे. यामुळे सहाव्यांदा विजेतेपद पटकावण्याची स्वप्ने पाहणा:या यजमान ब्राझील संघाला जबरदस्त धक्का बसला. हे कमी म्हणून की काय, कर्णधार थिएगो सिल्वा याला दोनदा एलो कार्ड दाखविण्यात आल्यामुळे एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. याचाच अर्थ, बलाढय़ जर्मनीविरुद्ध होणा:या उपांत्य लढतीत आता ब्राझीलला या दोन्ही दिग्गज खेळाडूंविना उतरावे लागेल.
या सामन्यात ब्राझीलने कोलंबियावर 2-1ने विजय मिळवला असला तरी 88व्या मिनिटाला घडलेली घटना संपूर्ण ब्राझीलवासीयांना सुन्न करणारी ठरली. चेंडूवर नियंत्रण मिळवण्याच्या नादात कोलंबियाचा 28 वर्षीय दणकट बचावपटू जुनिगा किरकोळ शरीरयष्टीच्या नेमारवर आदळला. यादरम्यान त्याच्या गुडघ्याचा फटका नेमारच्या पाठीला लागला. हा फटका इतका जबरदस्त होता की, वेदनेने विव्हळत नेमार मैदानावरच कोसळला. यानंतर तो उठू शकला नाही. अखेर त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्याच्या मणक्याला फ्रॅक्चर झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. 22 वर्षीय स्टार स्ट्रायकर नेमारची दुखापत खूप गंभीर नसली तरी तो किमान काही आठवडे खेळू शकणार नाही. येत्या मंगळवारी (दि. 8) ब्राझीलला उपांत्य फेरीच्या हाय व्होल्टेज लढतीत जर्मनीविरुद्ध खेळायचे आहे. (वृत्तसंस्था)
या विश्वचषकात ब्राझीलचे आशास्थान असलेल्या नेमारने शानदार कामगिरी करीत आपल्या संघाकडून सर्वाधिक 4 गोल केले आहेत. प्रथमच विश्वचषकात खेळणा:या नेमारने अपेक्षांचे ओङो पेलत संघाला उपांत्य फेरीर्पयत मजल मारून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
सुदैवाने नेमारची दुखापत फारशी गंभीर नाही. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचीही आवश्यकता नाही. मात्र, या दुखापतीतून पूर्णपणो बरा होण्यासाठी त्याने काही दिवस आराम करणो आवश्यक आहे. दुर्दैवाने तो विश्वचषकातील पुढील सामन्यांत खेळू शकणार नाही. त्याला बरा होण्यास काही आठवडय़ांचा अवधी लागेल.
- डॉ. रॉड्रिेगो लेङमार, ब्राझील संघाचे डॉक्टर
नेमारला पर्याय कोण?
नेमारसारखा हुकमी एक्का दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाल्याने यजमान ब्राझीलसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. स्ट्रायकर नेमारला पर्याय कोण, हा प्रश्न प्रशिक्षक लुईस फिलीप स्कोलारी यांना सतावत आहे.
कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता बाळगणा:या नेमारला पर्याय म्हणून सेंटर फॉरवर्ड फ्रेड आणि जो फारच कच्चे वाटतात. या दोघांऐवजी फर्नाडिन्होला स्कोलारी आजमावू शकतात किंवा फ्रेड आणि जो या जोडीला ते आघाडीच्या फळीत खेळवण्याचा निर्णय घेऊ शकतात. अशा स्थितीत हल्क आणि ऑस्टर यांना पूर्णपणो मिडफिल्डरची भूमिका बजावावी लागेल. या दोघांवर सध्या मिडफिल्डर कम विंगरची जबाबदारी आहे. जर्मनीविरुद्ध महत्त्वाच्या लढतीसाठी स्कोलारी आपला आवडता मिडफिल्डर 21 वर्षीय बर्नाडला संधी देण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. बर्नाड युवा असला तरी वेगवान चाली रचण्यात माहीर आहे. 197क्मध्ये ब्राझीलला विश्वचषक जिंकून देणारे माजी कर्णधार कालरेस अल्बटरे टोरेस विल्यम्सला संधी देण्याच्या बाजूने आहेत. नेमारला पर्याय म्हणून नेमकी कोणाला संधी मिळते, ते जर्मनीविरुद्धच्या लढतीआधीच कळेल.
अवघे ब्राझील स्तब्ध..
च्यजमान संघाने कोलंबियावर विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली तरी नेमारला झालेल्या दुखापतीमुळे अखघे ब्राझील विव्हळले. नेमारसारखा हुकमी एक्का या स्पर्धेत खेळणार नसल्याने सहाव्या विश्वविजेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेले ब्राझीलवासी स्तब्ध झाले आहेत. नेमारविना जर्मनीविरुद्ध आपले काय होणार, याची चिंता त्यांच्या चेह:यावर दिसतेय.
च्झुनिगा नेमारवर आदळलेल्या घटनेची तपशीलवार छायाचित्रे ब्राझीलमधील अनेक वृत्तपत्रंनी प्रसिद्ध केली आहेत. यात तो नेमारच्या कंबरेवर गुडघा मारताना दिसतो. 19 वर्षीय महाविद्यालयीन युवक
फॅ बियन रुईझ या विषयावर प्रतिक्रिया देताना म्हणाला, ‘‘ही आम्हा ब्राझीलवासीयांसाठी भयानक घटना आहे.’’
महत्त्वाच्या सामन्यांत नेमारसारखा हिरा नसेल. कोलंबियाविरुद्धचा सामना आम्ही जिंकला असला तरी यात नेमारला आम्ही विश्वचषकापुरते गमावले. जुनिगा ज्या पद्धतीने नेमारवर आदळला ते पाहूनच आता त्याचे विश्वचषकात खेळणो अवघड असल्याची जाणीव मला झाली होती. केवळ या सामन्यातच नव्हे तर विश्वचषकातील आमच्या प्रत्येक लढतीत प्रतिस्पर्धी खेळाडूंनी नेमारला टार्गेट केले होते. मागील 3 सामन्यांपासून मी ही बाब लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करीत आहे. - लुईस फिलीप स्कोलारी, ब्राझीलचे प्रशिक्षक