फोर्टालेजा : डेव्हिड लुईजने फ्री किकवर 35 यार्ड अंतरावरून नोंदविलेल्या सनसनाटी गोलच्या जोरावर ब्राझीलने दक्षिण अमेरिकन प्रतिस्पर्धी कोलंबियाचा 2-1 ने पराभव केला आणि फिफा विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत ब्राझीलला जर्मनीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
लुईजने 69 व्या मिनिटाला फ्री किकवर शानदार गोल नोंदवित ब्राझीलला 2-क् अशी आघाडी मिळवून दिली. त्याआधी, थिएगो सिल्वाने मध्यंतरापूर्वी नेमारच्या कॉर्नर किकवर यजमान संघाचे खाते उघडले होते. कोलंबियातर्फे जेम्स रोड्रिगेजने 8क् व्या मिनिटाला पेनल्टीवर नोंदविलेला गोल पराभवातील अंतर कमी करणारा ठरला. ब्राझीलने अखेर 2-1 ने विजयावर शिक्कामोर्तब करीत अंतिम चारमधील प्रवेश निश्चित केला. उपांत्य फेरीत ब्राझीलला युरोपियन पॉवर हाऊस जर्मनीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. याआधी खेळल्या गेलेल्या उपांत्यपूर्व सामन्यात जर्मनीने परंपरागत प्रतिस्पर्धी फ्रान्सचा 1-क् ने पराभव केला.
मंगळवारी खेळल्या जाणा:या लढतीपूर्वी यजमान संघापुढे अडचण निर्माण झाली आहे. ब्राझीलचा कर्णधार थिएगो सिल्वा याला दुस:यांदा पिवळे कार्ड दाखविण्यात आल्यामुळे उपांत्य फेरीच्या लढतीला त्याला मुकावे लागणार आहे. ब्राझीलचा स्टार स्ट्रायकर नेमारच्या फिटनेसबाबत साशंकता आहे. कोलंबियाचा डिफेंडर जुआन कॅमिलो जुनिगाने धडक दिल्यामुळे दुस:या सत्रत नेमारला मैदान सोडण्यासाठी स्ट्रेचरचा आधार घ्यावा लागला. जुनिगाचा गुडघा नेमारच्या पाठीवर लागला. त्यामुळे ब्राझीलच्या स्ट्रायकरला उपचारासाठी रुग्णालयात न्यावे लागले. ब्राझीलने 12 वर्षानंतर विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरीमध्ये स्थान मिळविले. (वृत्तसंस्था)