अँडरसन-जडेजा वाद : बीसीसीआय आयसीसीच्या संपर्कात
मुंबई : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला ट्रेन्टब्रिज कसोटीदरम्यान भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजासोबत झालेल्या वादामध्ये ‘निदरेष’ सोडल्याच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्यासाठी बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) आयसीसीला (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) ई-मेल पाठविला आहे.
आयसीसीतर्फे नियुक्त करण्यात आलेले आयुक्त गोर्डन लुईस यांनी दिलेल्या निर्णयामुळे बीसीसीआय नाराज आहे. बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सोमवारी रात्री आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांना ई-मेल पाठविला. लुईस यांनी सुनावणीदरम्यान वेगवान गोलंदाज अँडरसनला निदरेष सोडले.
बीसीसीआयचे सचिव संजय पटेल म्हणाले, ‘आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांना निर्णयाविरुद्ध अपील दाखल करण्यासाठी सोमवारी रात्री पत्र लिहिले. संघव्यवस्थापनासह आम्हा सर्वाना यात चूक असल्याचे वाटते. यावर काय कारवाई होते, याबाबत उत्सुकता आहे. या निर्णयाविरुद्ध अपील करण्याचा आम्हाला अधिकार नाही. केवळ आयसीसीला तो अधिकार आहे. त्यामुळे मी रिचर्डसन यांना पत्र लिहिले असून, आगामी 48 तासांमध्ये याबाबत निर्णय होईल, अशी आशा आहे.’
पटेल पुढे म्हणाले, ‘जडेजाला धक्का दिल्याचे अँडरसनने कबूल केल्यानंतरही त्याला निदरेष का ठरविण्यात आले, हे न उलगडणारे कोडे आहे. यामुळे आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन झाले.’ दरम्यान, जडेजा व अँडरसन यांच्या दरम्यान झालेल्या वादाचे व्हिडीओ फुटेज उपलब्ध नाही.
आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्डसन सुटीवर होते. ते आता कामावर रुजू झाले असून, लुईस यांनी दिलेल्या निर्णयाची प्रत मिळाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधी सल्लागारांसोबत चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे रिचर्डसन यांनी सांगितले. त्यांना या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी 1क् ऑगस्टर्पयतची मुदत आहे. (वृत्तसंस्था)
4दुबई : जेम्स अँडरसन व रवींद्र जडेजा यांच्या दरम्यान झालेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर न्याय आयोगाचा सखोल अहवाल प्राप्त झाला असून, यावर भविष्यात कारवाई करण्याचा विचार करीत असल्याचे आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) स्पष्ट केले.
4आयसीसीने म्हटले आहे की, ‘शुक्रवारी साउदम्पटनमध्ये शिस्तपालन समितीच्या सुनावणीनंतर इंग्लंडचा जेम्स अँडरसन व भारताचा रवींद्र जडेजा दोषी नसल्याचे आढळून आले. विधी आयुक्त गोर्डन लुईस एम. याचा निर्णय आम्हाला मिळालेला असून, आम्ही त्यावर विचार करीत आहोत.’
4आयसीसी आचार संहिता नियम 8.3.2 नुसार आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांना 1क् ऑगस्टर्पयत या निर्णयाविरुद्ध अपील करायचे अथवा नाही, याचा निर्णय घ्यावा लागणार आहे.
4आयसीसीने पुढे स्पष्ट केले की, ‘निर्णय होईस्तोवर आयसीसी या प्रकरणावर प्रतिक्रिया देणार नाही.’
4विधी आयुक्त लुईस यांच्या निर्णयामुळे अँडरसनला दिलासा मिळाला आहे. अँडरसनवर लेव्हल-3 चा आरोप होता. यात दोषी आढळला असता, तर अँडरसनला दोन कसोटी सामन्यांच्या बंदीच्या शिक्षेला सामोरे जावे लागले असते.
4रिचर्डसन यांनी अपील करण्याचा निर्णय घेतला, तर आयसीसी आचारसंहिता पॅनलमधील सदस्यांपैकी तीन सदस्यांचे पॅनल गठित करण्यात येईल. आयसीसीच्या घटनेनुसार या पॅनलला 3क् दिवसांमध्ये निर्णय घेता येईल. त्यामुळे अँडरसनला पूर्ण कसोटी मालिका खेळण्याची संधी मिळणार आहे.