शहरं
Join us  
Trending Stories
1
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
2
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
3
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
4
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
5
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
6
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
7
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
8
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
9
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
11
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
12
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
13
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
14
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
15
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
16
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
17
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
18
मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?
19
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?

टोल वाचवण्यासाठी वाहनांवर अनधिकृत दिवे

By admin | Updated: February 6, 2017 04:49 IST

महामार्ग आणि इतरत्र होणाऱ्या पोलीस कारवायांपासून वाचविण्यासाठी आणि टोलमुक्त होण्यासाठी वाहनांवर पोलीस, महाराष्ट्र शासन,

सिकंदर अनवारे , दासगावमहामार्ग आणि इतरत्र होणाऱ्या पोलीस कारवायांपासून वाचविण्यासाठी आणि टोलमुक्त होण्यासाठी वाहनांवर पोलीस, महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार, पत्रकार आदी महत्त्वपूर्ण विभागाचे बोर्ड आणि दिव्यांचा वावर सर्रास करण्यात येत आहे. आरटीओच्या नियमाप्रमाणे खासगी वाहनांचा अशा प्रकारे नाव आणि दिव्यांचा वापर हा गुन्हा आहे. असे असताना अशा वाहनांची नाकेबंदी केली जात नाही. अशा पाट्या अगर दिव्यांच्या गाड्यांमध्ये कोणीतरी बडा असामी अगर अधिकारी असेल या भीतीने पोलीस देखील या वाहनांवर कारवाई करण्यास घाबरत आहेत. त्यामुळे आरटीओने या प्रकरणी विशेष मोहीम काढून कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे. संसदेत झालेला हल्ला हा लाल दिव्याच्या अ‍ॅम्बॅसिडर गाडीतून आलेल्या अतिरेक्यांनी केला होता. लाल दिव्याची अ‍ॅम्बॅसिडर होती म्हणून सुरक्षा रक्षकांनी अधिक चौकशी न करता गाडी संसद परिसरात सोडली होती. या घटनेची दखल घेत अनधिकृत दिव्यांचा वापर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्या लावण्यावर न्यायालयाने बंदी घातली होती. तसा आदेशही पोलीस आणि परिवहन विभागाला आला होता. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कारवाया झाल्या. हे प्रकरण लागलीच थंडावले त्यामुळे आजही सर्वत्र प्रेस, महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार यासारख्या विविध कार्यालयांचे बोर्ड लावून खासगी वाहने फिरत आहेत. अनेक बडे सरकारी अधिकारी अशा प्रकारचा वापर आपल्या खासगी वाहनांवर करताना दिसत आहेत. त्यांना मिळणारी व्हीआयपी सुविधा बघून अनेक तोतयांनी देखील मान वर काढली आहे. पत्रकार, पोलीस अगर कोणत्याही शासकीय कार्यालयाशी संबंध नसताना हे तोतया आपल्या वाहनांवर अशा प्रकारच्या पाट्या अगर दिवे वापरत आहेत. रस्त्यावर पोलिसांनी अशा वाहनांना थांबवून विचारले असता शेखी मिरवत पोलीस कर्मचाऱ्यांशी हे हुज्जत देखील घालत असतात.परिवहन विभागाच्या नियमाप्रमाणे अशा प्रकारच्या पाट्या अगर दिव्यांच्या वापरावरती निर्बंध असून क्षुल्लक कारवाईची अट आहे. तर अशा वाहनांवर केसेस करून न्यायालयासमोर हजर करणे आहे. मात्र या खात्याची आतापर्यंत अशा प्रकारे पाट्या किंवा दिवे लावणाऱ्यांवर कोणतीच कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. उलट या कारवाईबाबत परिवहन विभाग पोलिसांकडे तर पोलीस परिवहन विभागाकडे बोट दाखवण्याचे काम करत आहे. यामुळे अशा पाट्या आणि दिवे लावणारे आणि त्याचा गैरफायदा घेणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. महामार्ग वाहतूक शाखा महाड यांच्याकडून उपलब्ध माहितीनुसार त्यांच्याकडे १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ या एक वर्षाच्या कालावधीत ९ हजार ८३९ केसेस वाहन चालकांवर करण्यात आल्या असून १० लाख २० हजार एवढी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. या कारवाईमध्ये सीट बेल्ट, सिफ्लेक्टर वाहतुकीस अडथळा, वाहनासोबत क्लिनर नसणे, हेल्मेट बॅच नसणे, ड्रेस व तीन सीट केसेस झाल्या. दर दिवशी या महामार्गावरून शेकडो वाहने पोलीस पाटी, प्रेस, महाराष्ट्र शासन, कें द्र सरकार अशा अनेक पाट्या लावून यांच्यासमोरून जात आहेत. इतर कारवाया होत असताना देखील अनधिकृत दिवे आणि पाट्या लावणाऱ्यांवर कारवाई केली जात नसल्याने खंत व्यक्त करण्यात येत आहे.अशा पाट्या अगर दिव्यांचा वापर करणाऱ्या वाहनांवर केवळ १०० रुपये इतक्या दंडाची कारवाई पूर्वी होती. आता नव्याने बदल केलेल्या १७७ व्या नियमाप्रमाणे २०० रुपये इतकी असून वाहनावरून दिवा तसेच पाटी व स्टीकर काढून टाकणे. वर्षभर पाट्यांचा आणि दिव्यांचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तींनाही दंडात्मक रक्कम क्षुल्लक असून त्याचा काहीही फरक पडत नाही. तरी अशा वाहनांवर कायद्यात बदल करून कठोर कारवाईची गरज असल्याचे बोलले जात आहे.तोतया पत्रकारांचा कारवाईत अडथळासध्या प्रत्येक ठिकाणी तोतया पत्रकारांचा सुळसुळाट सुरू आहे. कोणत्या तरी साप्ताहिकाचा किंवा अस्तित्वात नसलेल्या वृत्तपत्राचे कार्ड तयार करायचे आणि आपल्या खासगी वाहनावर प्रेस असे बोर्ड लावून आपल्या कार्डची धमक दाखवत फिरायचे, मात्र अशा प्रकारचे उद्योग तोतया पत्रकारांकडून मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. अशा तोतया पत्रकारांनी आपल्या वाहनांवर प्रेस असे स्टीकर लावून हैदोस घातला आहे. तरी अशा पत्रकारांची सखोल होवून यांच्यावर कारवाई करण्याची सामान्यांकडून मागणी करण्यात येत आहे.