शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
3
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
4
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
5
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
6
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
7
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
8
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
9
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
10
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
11
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
12
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
13
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
14
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
15
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
16
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
17
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
18
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
19
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
20
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार

छाननीमध्ये हरकती, आक्षेपांना बगल

By admin | Updated: February 8, 2017 04:21 IST

निवडणुका म्हटल्या की उमेदवारी अर्जाच्या छाननीपासूनच एकमेकांना जेरीस आणण्याची संधी राजकीय पक्षांनी कधीच सोडली नाही.

अलिबाग : निवडणुका म्हटल्या की उमेदवारी अर्जाच्या छाननीपासूनच एकमेकांना जेरीस आणण्याची संधी राजकीय पक्षांनी कधीच सोडली नाही. हरकती आक्षेप घेऊन विरोधकांच्या उमेदवारांना अडचणीत आणून तो निवडणुकीच्या रिंगणातून बाद कसा होईल हे पाहिले जायचे मात्र आताच्या निवडणुकीत समोरासमोर थेट लढूनच विरोधी उमेदवाराला नामोहरण करण्याची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी केल्याचे मंगळवारच्या छाननी प्रक्रियेच्या वेळी दिसून आली. अलिबाग तालुक्यातील चेंढरे जिल्हा परिषद गटातून एका उमेदवाराचा अर्ज छाननीमध्ये बाद करण्यात आला. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया मंगळवारी पार पडली. काँग्रेस, शिवसेना, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या उमेदवारांवर हरकती आक्षेप घेण्याचे प्रमाण अल्प असल्याचे दिसून आले. सर्वच राजकीय पक्षांनी समझोत्याची भूमिका घेतली. हाच ट्रेंड अन्य तालुक्यांमध्येही कमी-अधिक प्रमाणात दिसून आला. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या समोरासमोर थेट लढण्याचे संकेत राजकारण्यांनी दिल्याचे दिसून येते.अलिबाग तालुक्यातील चेंढरे जिल्हा परिषद गटातून एका उमेदवाराचा अर्ज छाननीमध्ये बाद करण्यात आला. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या सात जागांसाठी ३८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ६६ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. मंगळवारी सकाळी उमेदवारी अर्जाच्या छाननी प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यावेळी शिवसेनेचे महेंद्र दळवी, विजय कवळे, दीपक रानवडे, काँग्रेसचे प्रदेश सदस्य अ‍ॅड. जे.टी. पाटील, हर्षल पाटील, अ‍ॅड. कौस्तुभ पुनकर, शेकापचे संजय पाटील, अ‍ॅड. सचिन जोशी, अ‍ॅड.परेश देशमुख, अजय झुंझारराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे ऋषिकांत भगत विविध राजकीय पक्षांचे उमेदवार, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रांताधिकारी कार्यालयात उपस्थित होते. एकमेकांच्या उमेदवारांबाबत काही आक्षेप आहेत का, अशी विचारणा शिवसेनेचे महेंद्र दळवी यांनी शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह पदाधिकारी यांना केली. त्यावेळी कोणाचेही कोणाच्या उमेदवाराबाबत आक्षेप नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उमेदवारी अर्जाच्या छाननी प्रक्रियेच्या वेळी प्रांताधिकारी यांनी आक्षेप आहे, का असे विचारले असता, कोणीच आक्षेप घेतला नाही. राजकारण्यांमध्ये समझोताच्अलिबागमध्ये कोणाचाही उमेदवाराबाबत आक्षेप नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उमेदवारी अर्जाच्या छाननी प्रक्रियेच्या वेळी प्रांताधिकारी यांनी आक्षेप आहे, का असे विचारले असता, कोणीच आक्षेप घेतला नाही. त्यामुळे छाननी प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यास मदत झाली. आक्षेप असते, तर कालावधी लांबण्याची शक्यता होती. राजकीय नेत्यांनी आपापसात समझोता करुन घेतल्याने निवडणुका शांततेत पार पडणार असल्याचे बोलले जाते. अन्य तालुक्यांमध्येही असेच कमी-अधिक प्रमाणात समझोते झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोषक वातावरणात निवडणुका लढण्याची मानसिकता राजकारण्यांनी केल्याचे दिसून येते. उमेदवाराच्या उमेदवारीवर हरकती, आक्षेप घेत तो रिंगणातून बाद कसा होईल हे पाहिले जायचे. आता मात्र त्याला जिल्ह्यामध्ये छेद दिल्याचे चित्र आहे.कर्जत तालुक्यात १८ जागांसाठी १११ उमेदवार रिंगणात1 कर्जत : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी २१ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात एकूण १२४ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती. मंगळवारी छाननीच्या वेळी जिल्हा परिषद गटामध्ये १ तर पंचायत समिती गणामध्ये १ अशी दोन नामनिर्देशनपत्रे अवैध ठरली आहेत. काही उमेदवारांनी सुरक्षितता म्हणून दोन नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. त्यामुळे त्यापैकी एक नामनिर्देशनपत्र ग्राह्य धरल्याने १११ नामनिर्देशनपत्रे वैध ठरविण्यात आली. असे असले तरी १३ फेब्रुवारीला नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल.2मंगळवारी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात नवी मुंबई महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त तथा निवडणूक निरीक्षक रमेश चव्हाण यांच्या निरीक्षणाखाली निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भडकवाड यांनी छाननी सुरु केली. कळंब, पाथरज, उमरोली, नेरळ, सावेळे, बीड असे जिल्हा परिषदेचे सहा गट आहेत. त्यामध्ये ४० नामनिर्देशनपत्रे दाखल होती, मात्र छाननीत उमरोली गटातील अरु ण भोईर यांनी अनामत रक्कम न भरल्यामुळे त्यांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले तर काही उमेदवाराची दोन नामनिर्देशनपत्रे होती त्या एकच ग्राह्य धरल्याने जिल्हा परिषद गटामध्ये ३८ नामनिर्देशनपत्रे वैध आहेत.