शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

पाणीटंचाईवर जलदानाचा पर्याय

By admin | Updated: April 22, 2016 02:08 IST

तालुक्यात १४ गावे आणि ३४ आदिवासी वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. हा शासनाने तयार केलेला पाणीटंचाई आराखडा आहे. मात्र त्यापेक्षाही जास्त गावे आणि वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे.

कर्जत : तालुक्यात १४ गावे आणि ३४ आदिवासी वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. हा शासनाने तयार केलेला पाणीटंचाई आराखडा आहे. मात्र त्यापेक्षाही जास्त गावे आणि वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. या वाड्यांमधील अनेक महिलांना डोक्यावर चार-चार हंडे घेऊन एक किलोमीटरपेक्षा जास्त पायपीट पाण्यासाठी करावी लागत आहे. हे चित्र लक्षात घेऊन कर्जतमधील जलदूतांनी जशी लातूरकरांची तहान भागविली तसेच या आदिवासींना पाणी द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.महिला वयोमानाप्रमाणे जमेल तशी भांडी घेवून पाणी भरण्यासाठी निघतात. काही ठिकाणी तर कोरड्या पडलेल्या नदीच्या पात्रात डवरे खोदून मिळेल तेवढे पाणी भरण्याचा प्रयत्न करत आहेत. टंचाईग्रस्त गावांचा व वाड्यांचा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयात गेला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यावर या गावासाठी पाण्याचे टँकर मिळतील. मात्र तोपर्यंत या भगिनींना पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागेल. माणुसकीच्या नात्यातून लातूरमधील तहानलेल्यांना पाणी पुरविण्याचे पुण्याचे काम करत आहेत. जलदान करणाऱ्या त्या संस्था, वैयक्तिक जलदान करणाऱ्या व्यक्ती यांनी पुढे येऊन कर्जत तालुक्यातील एक-एक वाडी दत्तक घेतली आणि त्यांना एक दिवसाआड पाण्याचा टँकर पुरविला. कर्जत तालुक्यातील गावांची आणि वाड्यांची पाणीटंचाई दूर होईल, असे येथील नागरिकांचे मत आहे. (वार्ताहर)> माजी विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी१नेरळ : कर्जत तालुक्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन, आपली समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न नेरळ विद्या मंदिर शाळेच्या माजी विद्यार्थी यांच्या एका वर्गातील सहकाऱ्यांनी के ला आहे. त्यानुसार खांडस भागातील काही आदिवासी वाड्यांमध्ये ते माजी विद्यार्थी टँकरने पाणीपुरवठा करीत आहेत. अगदी पावसाळा सुरु वात होईपर्यंत तेथे पाणीपुरवठा करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.२प्रवीण रामचंद्र ब्रम्हांडे याने आपल्या वडिलांकडून समाजसेवेचा वसा घेतला आहे. पाणीटंचाईग्रस्त गाव पाड्यांना भेट देवून नेरळ विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थ्यांनी दोन महिने टँकरने पाणीपुरवठा करण्याचे कार्य हाती घेतले आणि माणुसकीचे दर्शन घडवले. ९६-९७ च्या बॅचचे सदस्य सोशल मीडियावर एकत्र आले. तेव्हा प्रवीण ब्रह्मांडे यांनी वर्गमित्रांंच्या मदतीने केवळ सामाजिक बांधिलकीचे संदेश देणाऱ्या पोस्ट न टाकता प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक बांधिलकी जोपासली.३तालुक्यातील काटेवाडी, बेलाचीवाडी, अंबरपाडा, बांगरवाडी, ढाब्याचीवाडी, पेटरवाडी, खांडस या गावना स्व:ता वर्गणी काढून दररोज पाणी पुरविण्याचा निर्णय घेतला असून त्याची सुरु वात देखील के ली. हा उपक्र म ३१ मेपर्यंत सुरु राहणार आहे. प्रवीण ब्रह्मांडे, नरेश पवार, प्रभाकर जाधव, अमित ठाकूर, प्रवीण मोरगे, संदीप उतेकर, समीर शेख, विनायक बिडकर, केदार खडे, पराग तावडे, जगदीश डबरे, अरविंद ठोंबरे, रितेश भालेराव, प्रीतम पाटील आदींनी या कामी स्वत:ला झोकून दिले आहे.> जैन बांधव भागवणार ओलमणची तहाननेरळ : तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या ओलमण येथील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी नेरळ जैन संघाने पुढाकार घेतला आहे. तेथील विहिरीमध्ये एकावेळी दोन टँकर ओतून या उपक्र माचा शुभारंभ करण्यात आला.सुमारे १०० घरांची लोकवस्ती असलेल्या ओलमण गावाला पाणीपुरवठा करणारी नळ पाणी योजना अनेक वर्षे बंद आहे. बोरगाव ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या ओलमण गावासाठी दोन विहिरी खोदल्या आहेत, परंतु या विहिरींनी जानेवारी महिन्यातच तळ गाठल्याने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ओलमण गाव उंचावर असल्याने आदिवासी महिलांना दुसऱ्या गावातील विहिरीवरून पाणी आणण्यासाठी डोंगर उतरून जावे लागते. प्रत्येक उन्हाळ्यात चार महिने आदिवासींना पाण्यासाठी भटकावे लागते. याठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यातही लोकप्रतिनिधी तसेच स्थानिकांचे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आदिवासी वाडीतील पाणीसमस्या सोडविण्यासाठी नेरळमधील जैन सकल संघ आणि श्री जैन संघ यांनी पुढाकार घेत टंचाईग्रस्त गावाला पाणीपुरवठा सुरु केला आहे. गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र हे पाणी गावातील विहिरीत टाकण्यात येऊन त्यानंतर वितरीत करण्यात येते. (वार्ताहर)