- वैभव गायकर, पनवेलपनवेल शहर व तालुक्यामधील १६५ गावांचे झपाट्याने नागरिकरण होत आहे. वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, यामुळे या परिसरातील वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे, परंतु ही वाहने उभी करण्यासाठी रेल्वे स्टेशन वगळता, इतर कुठेच वाहनतळ नाही. अवजड वाहनांसाठी कळंबोलीत फक्त एकच वाहनतळ आहे. यामुळे रोडचा वापर पार्किंगसाठी करावा लागत असून, पार्किंगची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. पनवेल तालुक्यामध्ये भविष्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जाणार आहे. मेट्रो रेल्वेचे जाळे उभे होत आहे. सिडको कार्यक्षेत्रामधील सर्व गावांमध्ये ५ ते २४ माळ्यांचे टॉवर उभे राहिले आहेत. सिडको क्षेत्राबाहेरील नैना क्षेत्रामध्येही झपाट्याने बहुमजली इमारती उभ्या राहत आहेत. कळंबोलीमधील स्टील मार्केट, ट्रान्स्पोर्टची कार्यालये, तळोजा एमआयडीसी व जवळच असलेल्या जेएनपीटीमुळे या परिसरात हजारो अवजड वाहनांची रोज वर्दळ असते. फक्त पनवेल उपप्रादेशिक कार्यालयामध्येच १२ हजारांपेक्षा जास्त ट्रक, टेंपो, टँकरची नोंदणी झाली आहे. एवढीच वाहने इतर ठिकाणावरून येत आहेत. कळंबोळीमधील एकमेव ट्रक टर्मिनलमध्ये यामधील १०टक्केही वाहने उभी राहू शकत नाहीत. अवजड वाहनांप्रमाणेच स्थिती मोटारसायकल व इतर खासगी वाहनांची झाली आहे. पनवेल उपप्रादेशिक कार्यालयामध्ये तब्बल ५६,१९९ मोटारसायकल व ३०,९९३ कारची नोंदणी झाली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात तब्बल १ लाख १९ हजार ३०१ वाहनांची नोंद झाली आहे. नवी मुंबई व इतर ठिकाणी नोंदणी असलेली हजारो वाहने असून, ती कुठे उभी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सिडकोने खारघर ते कळंबोली, नवीन पनवेल परिसरात शहर उभे केले आहे, परंतु रेल्वे स्टेशन वगळता, कुठेच वाहनतळासाठी जागा ठेवलेली नाही. पनवेल शहरामध्ये नवीन इमारतींचे बांधकाम करताना पार्किंगसाठी पुरेशी जागा ठेवली जात नाही. सिडको नोडमध्येही इमारतीमधील वाहने उभी करण्याची जागा व प्रत्यक्षात वाहने यामध्ये प्रचंड तफावत असल्याने इमारतीच्या बाहेर रोडवरच वाहने थांबवावी लागत आहेत. पनवेल एस. टी. डेपो परिसरामध्ये सदैव वाहनांची वर्दळ असते.पार्किंगवरून कायदा सुव्यवस्था धोक्यातभविष्यात पनवेल हे मुंबईनंतर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असणार आहे. विमानतळ, एमआयडीसी, जेएनपीटी, नैना, रेल्वे टर्मिनस, यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढत आहे. २०११ च्या जनगणनेप्रमाणे देशातील सर्वाधिक झपाट्याने नागरिकरण वाढणाऱ्या शहरामध्ये या परिसराचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्याही वाढत आहे. आत्ताच पार्किंगची समस्या गंभीर झाली असून, आत्तापासून योग्य नियोजन झाले नाही, तर भविष्यात वाहन पार्किंगवरून सर्वाधिक गुन्हे घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नगर विकासाच्या नियमानुसार नगरपरिषद नवीन इमारतींना परवानगी देत असते. यामध्ये पार्किंग स्पेस किती असावा, या विषयी नियम ठरले आहेत. भविष्यात या नियमांमध्ये बदल झाल्यास सुधारित तरतुदीप्रमाणे पार्किंग बंधनकारक केली जाऊ शकते. पालिकेच्या वाणिज्य संकुलावरही ओव्हरहेड पार्किंग करण्याचा विचार आहे, इतरही पर्यायांचा विचार सुरू आहे. -मंगेश चितळे, मुख्याधिकारी, पनवेल, नगरपरिषदपनवेल तालुक्यात औद्योगिक वसाहतीचा परिसर मोठा आहे, परंतु येथे येणाऱ्या अवजड वाहनांसाठी वाहनतळच नाही. कळंबोलीमधील एकमेव ट्रक टर्मिनल पुरेसा नाही. याशिवाय शहरात रेल्वे स्टेशनव्यतिरिक्त कुठेच वाहनतळ नाहीत. नवीन इमारत बांधतानाही पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही. पार्किंगची समस्या गंभीर होत असून, सिडको व महापालिकेने वाहनतळासाठी जास्तीत जास्त जागा सोडावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. -अरविंद साळवे,पोलीस उपायुक्त, वाहतूकपनवेलमधील वाहनांची संख्याप्रकारसंख्यामोटारसायकल ५६१९९कार३०९९९जीप २०३टॅक्सी, कॅब्ज१३२४रिक्षा५८२७कंटेनर२०२रुग्णवाहिका९८ट्रक, लॉरी८६४७टँकर११४१चारचाकी मालवाहतूक२८१९तीनचाकी मालवाहतूक१५२६ट्रॅक्टर १३इतर९८६२एकूण११९३०१
पनवेलमध्ये पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर
By admin | Updated: February 11, 2016 02:54 IST