शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

घणसोलीत साकारतेय एनएमएमटीचे आदर्श आगार

By admin | Updated: October 6, 2015 00:54 IST

घणसोली येथे एनएमएमटीचे आदर्श आगार साकारत असून त्याचे काम शीघ्रगतीने सुरू आहे. मार्च २०१६ पर्यंत हे आगार सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या आगारामुळे

- सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबई घणसोली येथे एनएमएमटीचे आदर्श आगार साकारत असून त्याचे काम शीघ्रगतीने सुरू आहे. मार्च २०१६ पर्यंत हे आगार सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या आगारामुळे तुर्भे व आसुडगाव आगारावरील ताण कमी होवून परिवहनच्या सुविधेतही सकारात्मक बदल अपेक्षित आहे.घणसोली सेक्टर १५ येथे ९.५ एकर क्षेत्रफळाच्या भूखंडावर महापालिका परिवहन उपक्रमाच्या आगाराचे काम सुरु आहे. डिसेंबर २०१४ पासून सुरू झालेल्या या कामाला मार्च २०१६ पर्यंतची मुदत आहे. त्यानुसार उर्वरित सहा महिन्यांत हे आगार पूर्ण करण्याच्या उद्देशाने त्याठिकाणी शीघ्र गतीने कामे सुरूआहेत. घणसोलीचे आगार हे परिवहनच्या इतर दोन आगारापेक्षा आदर्श आगार बनवण्याचा परिवहनचा प्रयत्न आहे. याकरिता दोन आगारात आजपर्यंतच्या जाणवलेल्या त्रुटी त्याठिकाणी सुधारण्याचा प्रयत्न होत आहे. आगार होत असलेल्या भूखंडाच्या तीन बाजूला रस्ता असल्याने बस आत व बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे प्रवेशद्वार बनवले जाणार आहेत.त्याठिकाणी वाहनांची दुरुस्ती करुन धुण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानांचा वापर केला जाणार आहे. त्याशिवाय प्रशासकीय इमारत व कर्मचारी कँटीन यांचीही सोय त्याठिकाणी केली जात असल्याचे कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे यांनी सांगितले. परिवहनच्या ताफ्यात लवकरच १२५ नव्या बस येणार आहेत. या बस घणसोली आगारामार्फत घणसोली व कोपरखैरणे येथून सुटणाऱ्या विविध मार्गावर सुरु होण्याची शक्यता आहे. सध्या घणसोली व कोपरखैरणे येथून पनवेल, खारघर, तळोजा, उरण अशा लांबच्या मार्गावर धावणाऱ्या अनेक बस सुटतात. परंतु मार्ग फेरी संपल्यानंतर या बस उभ्या करण्यासाठी किंवा पुढचा मार्ग ठरवण्यासाठी तुर्भे आगारात पाठवल्या जातात. यामध्ये इंधनाचा वापर वाढून चालकांवरही ताण येतो. मात्र घणसोली येथील आगार सुरु झाल्यानंतर या सर्व मार्गावरील बस त्याठिकाणी थांबवल्या जाणार आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त ताण कमी होवून इंधनातही बचत होणार आहे. यामुळे परिवहनच्या दृष्टीने हे आदर्श आगार ठरणार आहे. तुर्भे आगाराच्या ठिकाणी डांबरीकरणामुळे काही वर्षातच खड्डे पडू लागले होते. यामुळे त्याठिकाणी काँक्रीटीकरण करण्यात आले. या अनुभवावरुन घणसोली आगारात सुरवातीलाच काँक्रीटीकरण केले जाणार आहे. या संपूर्ण कामाच्या दर्जावर आयआयटीचे नियंत्रण असणार आहे.घणसोली आगाराचे काम १८ महिन्यांच्या कामाच्या मुदतीवर देण्यात आले आहे. तुर्भे व आसुडगाव आगारात जाणवलेल्या त्रुटी त्याठिकाणी भेडसावणार नाहीत याची खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे परिवहनच्या सुविधेत सकारात्मक बदल होवून हे आदर्श आगार ठरणार आहे.- शिरीष आरदवाड, परिवहन व्यवस्थापक