शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या सत्ताकेंद्रातून राष्ट्रवादी बाद

By admin | Updated: May 10, 2016 02:11 IST

शिवसेना, भाजपाने काँग्रेसच्या मदतीने माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला आहे. स्थायी समिती सभापतीपद आपल्याकडे खेचून विरोधकांनी

कमलाकर कांबळे,  नवी मुंबई शिवसेना, भाजपाने काँग्रेसच्या मदतीने माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला आहे. स्थायी समिती सभापतीपद आपल्याकडे खेचून विरोधकांनी नाईक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला महापालिकेच्या सत्ताकेंद्रातून जवळ जवळ बाद केले आहे. कारण संख्याबळाने सर्वात मोठा पक्ष असून, राष्ट्रवादीकडे आता महापालिकेचे एकही महत्त्वाचे पद राहिलेले नाही. नवी मुंबईचे सर्वेसर्वा म्हणून गणेश नाईक यांची ओळख आहे. सलग २५ वर्षे महापालिकेत त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची एकहाती सत्ता मिळवून त्यांनी हे सिद्धही केले आहे. असे असले तरी मागील दोन वर्षांपासून नाईक यांचा हा डोलारा ढासळू लागला आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर लगेच झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या पक्षाला फारसी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे जेमतेम काठावर पास झालेल्या राष्ट्रवादीला अपक्ष आणि काँग्रेसच्या कुबड्या घेऊन महापालिकेत सत्ता स्थापन करावी लागली. विशेष म्हणजे ही तडजोड करीत असताना अपक्षाला चक्क महापौर आणि काँग्रेसला उपमहापौर पद द्यावे लागले. महापालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या राष्ट्रवादीला पहिल्या वर्षी केवळ स्थायी समिती सभापती पदावर समाधान मानावे लागले. परंतु नेत्यांच्या फाजील आत्मविश्वासामुळे आता हे पदसुध्दा राष्ट्रवादीला गमवावे लागले आहे. एकूणच सर्व असून ही काहीच नाही, अशीच काहीशी अवस्था आता राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे. या सर्व परिस्थितीला नाईक यांची पारंपरिक कार्यपध्दती जबाबदार असून, यात त्यांच्या दोन सुपुत्रांचे बऱ्यापैकी योगदान असल्याचे दिसून आले आहे.गणेश नाईक यांचे ज्येष्ठ चिरंजीव संजीव नाईक यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे छोटे चिरंजीव संदीप नाईक हे ऐरोली मतदारसंघातून काठावर पास झाले. मात्र बेलापूर विधानसभा क्षेत्रातून नाईक यांना पराभव पत्करावा लागला. हा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. याचा परिणाम म्हणून पुढील काही महिने त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी बंद केल्या. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात सापडले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काहीशी आक्रमक भूमिका घेतली. परंतु या आक्रमकपणामुळे त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाला जेमतेम सत्तेच्या काठापर्यंतच पोचता आले. एकूणच मागील दोन वर्षांत राजकीय रणनीती आखण्यात नाईक सातत्याने अपयशी ठरल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानतंर खऱ्या अर्थाने नाईक यांच्या साम्राज्याला हादरे बसायला सुरुवात झाली. नेत्यांच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते हवालदिल झाले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला मोठे भगदाड पडले. पक्षातील आजी-माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी स्वहिताचा विचार करीत सोयीच्या पक्षांची कास धरली. पक्षाला लागलेल्या या गळतीकडे नाईक पिता-पुत्रांनी सपशेल पाठ फिरविली. फाजील आत्मविश्वास व निष्ठावंताना गृहीत धरून विरोधकांना गोंजारण्याची नाईक पिता-पुत्रांची कार्यप्रणाली त्यांच्याच अंगलट आली. याचा जबर फटका महापालिका निवडणुकीत बसला. विशेष म्हणजे याचे दुरगामी परिणाम ज्ञात असतानाही नाईक बेसावध राहिले. त्यामुळे महापालिका तिजोरीच्या चाव्याही गमवाव्या लागल्या.