नवी मुंबई : काही दिवसांपासून शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. घरफोडीच्या दिवसाला सरासरी पाच घटना घडत आहेत. मागील पंधरा दिवसांत पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घरफोडीच्या तीनशेच्या जवळपास घटनांची नोंद झाली आहे. या गुन्ह्यांची उकल करण्यास नवी मुंबई पोलिसांना सपशेल अपयश आले आहे. त्यामुळे चोरट्यांचे मनोधर्य वाढले असून रहिवाशांत मात्र असुरक्षितता निर्माण झाली आहे.विशेषत: वाशी विभागात मागील आठ दिवसांत लहान-मोठ्या जवळपास २० चोरीच्या घटना घडल्या आहेत. सेक्टर १ ते ८ या परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. यातील बहुतांशी घटना दिवसाढवळ्या घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.वाशीपाठोपाठ नेरुळ विभागातही चोरट्यांनी हैदोस मांडला आहे. नव्याने विकसित होणाºया उलवे नोडमध्ये चोरट्यांच्या कारवायांमुळे रहिवासी हवालदील झाले आहेत. तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली, रबाळे, ऐरोली आदी परसरांत दरदिवशी संबंधित पोलीस ठाण्यात घरफोडीच्या लहान-मोठ्या घटनांची नोंद होत आहे. घरफोडीच्या या वाढत्या घटनांना प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा फोल ठरत आहे.खून, दरोडा, बलात्कार, आर्थिक फसवणूक आदी प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांचा तपास लावण्यात नवी मुंबई पोलीस आघाडीवर आहेत. एखाद्या गंभीर गुन्ह्याची २४ तासांत उकल करून आरोपीला अटक केली जाते. दुसºया दिवशी पत्रकार परिषद घेऊन त्याची माहिती दिली जाते; परंतु रहिवाशांच्या मालमत्तेवर बेमालूमपणे डल्ला मारणाºया भुरट्या चोरट्यांचा मात्र शोध घेतला जात नाही.
घरफोडीच्या घटनांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:37 IST