शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

मजुरांच्या मुलांची शिक्षणासाठी फरफट

By admin | Updated: November 14, 2015 02:27 IST

स्वत: झोपडीत राहून लोकांच्या स्वप्नातील घरांच्या निर्मितीसाठी रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या बांधकाम मजुरांच्या मुलांना आजही शिक्षणासाठी झगडावे लागत आहे.

प्राची सोनवणे,  नवी मुंबई स्वत: झोपडीत राहून लोकांच्या स्वप्नातील घरांच्या निर्मितीसाठी रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या बांधकाम मजुरांच्या मुलांना आजही शिक्षणासाठी झगडावे लागत आहे. शहरात एकीकडे टोलेजंग इमारती उभ्या राहत असताना इमारतीचे बांधकाम करणाऱ्या मजुरांच्या मुलांची अवस्था मात्र अत्यंत वाईट आहे. शहरातील सर्वच बांधकाम कामगार, नाका कामगारांची नोंदणी आजवर झालेली नसून नोंदणी न झालेल्या कामगारांच्या मुलांना शैक्षणिक मदतीसाठी शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नसल्याने या मजुरांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने ४ जुलै रोजी करण्यात आलेल्या शाळाबाह्य बालक सर्वेक्षणामध्ये एकूण १०९७ बालके शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास आले आहे. ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसह ग्रामीण भागातील शाळाबाह्य मुलांच्या तपासणीत ५२७७ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले.सिमेंट, मातीच्या ढिगाऱ्यावर भरते शाळानवी मुंबईतील सुप्रभा रावराणे या उच्चशिक्षित मुलीने आपल्या पदवीचा वापर पैसे मिळविण्यासाठी न करता शिक्षणापासून वंचित असलेल्या मजुरांच्या मुलांना तिच्या शिक्षणाचा फायदा कसा करता येईल यासाठी ती प्रयत्न करते. नवी मुंबईतील सर्व बांधकाम क्षेत्रातील मजुरांच्या मुलांना सुशिक्षित करण्यासाठी ती स्वत: त्या मुलांपर्यंत पोहोचून त्यांना लिहिता - वाचता यासाठी जीवापाड मेहनत घेते. यासाठी तिला पालकांच्या अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. मुलाला शाळेत पाठविण्यासाठी पुरेसा पैसा नाही, पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल त्या इमारती बांधकामाच्या ठिकाणी मजुरी करावी लागते. या अशा परिस्थितीत मुलांचे शिक्षण कसे पूर्ण करायचे अशी व्यथा या मजुरांनी मांडली. सिमेंट, वाळू, माती यांच्या ढिगाऱ्यावर भरणारी या मुलांची ही शाळा प्रत्येकाचे डोळे पाणावणारी आहे. या मुलांशी चर्चा केल्यावर आम्हाला शिकून खूप मोठं व्हायचं आहे आणि अशा उंच उंच इमारतीमध्ये आमचं स्वत:चं घर घ्यायचं असे निरागस उत्तर या मुलांनी दिले.नवी मुंबईतील सीबीडी सेक्टर ८ व १५, वाशी, पामबीच मार्ग, सानपाडा अशा अनेक ठिकाणी असलेल्या बांधकाम क्षेत्रात जाऊन तिथल्या मुलांना एकत्र गोळा करून मुळाक्षरे, कविता, गाणी, आकडेमोड शिकविली जाते. या लोकांमध्ये जनजागृती केल्याने एका वर्षाहून अधिक कालावधीपर्यंत सुरू राहणाऱ्या बांधकाम क्षेत्रातील मजुरांची ७० टक्के मुले आज महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत असल्याची माहिती सुप्रभा हिने दिली.