शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

आंब्याची निर्यात घसरली

By admin | Updated: June 3, 2016 02:01 IST

फळांचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या आंब्याची निर्यात घसरू लागली आहे. आठ वर्षांमध्ये निर्यात पन्नास टक्क्याने कमी झाली आहे.

नामदेव मोरे,  नवी मुंबईफळांचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या आंब्याची निर्यात घसरू लागली आहे. आठ वर्षांमध्ये निर्यात पन्नास टक्क्याने कमी झाली आहे. बदलते हवामान, मालाचा दर्जा व इतर कारणांनी ही घसरण होत आहे. ७० टक्के व्यवसाय आखाती देशांवर अवलंबून असून दोन दशकांमध्ये नवीन बाजारपेठा शोधण्यात आलेल्या अपयशामुळेही निर्यातीवर परिणाम होऊ लागला आहे. कृषी मालाची निर्यात वाढविण्यासाठी शासनस्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत. परंतु प्रत्यक्षात निर्यात वाढविण्यापेक्षा कमीच होत आहे. निर्यात घसरलेल्या कृषी मालामध्ये आंब्याचाही समावेश आहे. शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळावा व फळांचा राजा जगभर उपलब्ध व्हावा यासाठी दोन दशकांपासून आंब्याची निर्यात मोठ्या प्रमाणात सुरू झाली. १९९४ - ९५ मध्ये भारतामधून २५,४०६ मेट्रिक टन आंब्याची निर्यात झाली होती. निर्यातीमधून ४५ कोटींची उलाढाल झाली होती. पुढील दहा वर्षे निर्यात दुप्पट झाली. एकविसाव्या शतकामध्ये जगभरातील व्यापाराची प्रक्रिया सुलभ झाल्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असे वाटले होते. २००८ मध्ये तब्बल ८३,६९८ मेट्रिक टन एवढी निर्यात झाली. १९९५ च्या तुलनेमध्ये हा आकडा तिप्पट होता. परंतु त्यानंतर सुरू झालेली घसरण अद्याप थांबलेली नाही. भारतीय आंब्याचा व्यापार अडीच दशकांपासून आखाती देशांना नजरेसमोर ठेवूनच केला जात आहे. संयुक्त अरब अमिराती, कुवेत, कतार, बहरीन या देशांमध्ये ७० टक्के निर्यात होत आहे. बहुतांश निर्यात समुद्रमार्गे होत असून आता हवाई मार्गाने निर्यातीचा टक्काही वाढला आहे. आखाती देशांव्यतिरिक्त मोठी बाजारपेठ निर्माण करण्यात अद्याप यश आलेले नाही. आंबा अमेरिकेमध्ये गेल्याचे कौतुक सर्वत्र होते. परंतु एकूण व्यापारामध्ये हा आकडा नगण्यच आहे. २०१४ - १५ मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये २९,२३१ मेट्रिक टन निर्यात झाली होती. अमेरिकेमध्ये मात्र फक्त २७१ मेट्रिक टन निर्यात झाली होती. युरोपीयन देशांमध्ये व्यापार सुरू केला होता. परंतु दोन वर्षापूर्वी युरोपीयन देशांनी आंबा व इतर चार वस्तूंवर बंदी घातल्याने त्याचा परिणामही विदेशी व्यापारावर झाला आहे. निर्यातदार जास्तीत जास्त आंबा निर्यात करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रत्येक वर्षी हंगाम संपला की येणाऱ्या अडचणी शासनाकडे मांडल्या जात आहे. शासनही आता सहकार्य करू लागले आहे. परंतु त्यानंतरही निर्यात वाढत नाही. आंबा निर्यात वाढली तर देशांतर्गत मार्केटमध्येही चांगला बाजारभाव उपलब्ध होवू शकतो. यामुळे निर्यात वाढविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावे व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.