शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

एपीएमसीतील ३१ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: June 20, 2016 02:41 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मसाला व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेविरोधात आंदोलन केले होते

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मसाला व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेविरोधात आंदोलन केले होते. व्यापाऱ्यांच्या झुंडशाहीविरोधात पालिकेने कडक भूमिका घेतली आहे. शासकीय कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी ३१ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे व कारवाईला विरोध करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबईमधील अतिक्रमण विरोधी कारवाईचे स्वरूपाच बदलून टाकले आहे. महापालिका फेरीवाले, झोपडीधारक, प्रकल्पग्रस्त व इतर सर्वसामान्य नागरिकांवरच कारवाई करत असल्याचा समज निर्माण झाला होता. परंतु विद्यमान आयुक्तांनी श्रीमंतांनी केलेल्या अतिक्रमणांवरही हातोडा टाकण्यास सुरुवात केली आहे. निष्पक्ष कारवाईमुळे कायदा सर्वांसाठी समान असल्याची जाणीव होवू लागली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमधील मसाला व्यापाऱ्यांनी पालिकेची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केले आहे. या व्यापाऱ्यांनी यापूर्वी एमआरटीपीअंतर्गत नोटीस दिले होते. ५ मे रोजी सर्व अतिक्रमण २४ तासांमध्ये काढून टाकण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. यानंतर १६ मे रोजी कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना व्यापाऱ्यांनी विरोध केला. १४ जून रोजी पुन्हा कारवाई करण्यासाठी गेल्यानंतर व्यापाऱ्यांनी रास्ता रोको करून व गाळे बंद करून कारवाईमध्ये अडथळा निर्माण केला. यामुळे ३१ व्यापाऱ्यांचे गाळे सील करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे पत्र पोलिसांना दिले होते.विभाग अधिकारी भरत धांडे यांनी याविषयी लेखी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ३१ व्यापाऱ्यांविरोधात शासकीय कामात हस्तक्षेप केल्याचा व अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे दाखल झाल्यामुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.यापूर्वी सेस वसुलीसाठी गेलेल्या मनपा अधिकाऱ्यांना व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. आंदोलनाचे चित्रीकरण तपासले जाणारमहापालिकेने १४ जूनला कारवाई केली असताना काही व्यापाऱ्यांनी रास्ता रोको करून कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला. आंदोलन करणाऱ्यांचे व्हिडीओ चित्रीकरण केले आहे. चित्रीकरण व उपलब्ध छायाचित्रे तपासून कारवाईमध्ये नक्की कोणी अडथळा निर्माण केला हे तपासले जाणार असून कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.एपीएमसीमध्ये मुंढेंचा दबदबामुंबईमधून १९८१ मध्ये कांदा-बटाटा मार्केट नवी मुंबईत स्थलांतर झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर चार मार्केट स्थलांतर झाली. तेव्हापासून सातत्याने अतिक्रमण वाढत आहे. एपीएमसी प्रशासनाचे अभय असल्यामुळे व्यापारी महानगरपालिकेच्या नोटिसीकडे दुर्लक्ष करत होते. अतिक्रमण केल्याच्या नोटिसा देवूनही त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. परंतु आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थेट मसाला मार्केटमधील अतिक्रमणावर हातोडा टाकला. यामुळे एपीएमसीमध्ये मुंढे नावाचा दबदबा निर्माण झाला आहे. अतिक्रमण करणारे व त्यांना अभय देणारे अधिकारी सर्वांचेच धाबे दणाणले आहे. अतिक्रमण तुटण्याबरोबर गुन्हे दाखल होण्याची भीती वाटू लागली आहे. गुन्हे दाखल झालेल्या गाळेधारकांचा तपशीलराजेश ट्रेडिंग कंपनीकिसान कीर्ती अ‍ॅग्रोबी. जे. कमल एंटरप्रायझेसआर. गोपालजी आणि कंपनीदिलीपकुमार चंदुलाल आणि कंपनीजे. जे. अँड सन्सपी अम्रीतलाल अँड सन्सएस. जे. एंटरप्रायझेसनितेशकुमार सुरेशचंद अँड कंपनीसृष्टी सेल्स आणि सर्व्हिस चुन्नीलाल मंगीलाल कंपनीमहेश एल दामा व एम एल दामाईश्वर ट्रेडर्स कंपनीमेसर्स चावडा ब्रदर्सहसमुखलाल धीरजलाल कंपनीमहाराणी ट्रेडिंग कंपनीदिलीपकुमार अँड सन्सललित ट्रेडिंग कंपनीपीयूषकुमार आणि कंपनी जयाभाई पुंजीराम किराणा कंपनीके. के. कार्पोरेशननरोत्तमदास हरिवल्लभदास कंपनीनीलेश चंदू विनोद चंदूमहेंद्र अँड ब्रदर्स