मुंबई : राज्यातील शालेय विद्याथ्र्याच्या दप्तराचे ओङो कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने समिती स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात गेल्या अनेक वर्षापासून शालेय विद्याथ्र्याच्या दप्तराच्या ओङयाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पाश्र्वभूमीवर शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे येत्या काळात विद्याथ्र्याना दफ्तरांच्या ओङयापासून किमान सुटका मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शालेय विद्याथ्र्याच्या दप्तराच्या ओङयासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक जनहित याचिकाही दाखल करण्यात आली असून या याचिकेच्या पाश्र्वभूमीवर ओङो कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, यासाठी मागील आघाडी सरकारकडूनच प्रयत्न सुरू झाले
होते.
मात्र आता नवीन आलेल्या सरकारने यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक महावीर माने यांच्या अध्यक्षतेखाली आठ जणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालकांसह एक बालमानसशास्त्रतील तज्ज्ञ, शाळा संस्थाचालकांचा एक प्रतिनिधी, मुख्याध्यापक, पालक आदी एकूण आठ जणांचा या समितीत समावेश असेल. ही समिती विद्याथ्र्याच्या दप्तरांचे ओङो कमी करण्यासाठी उपाययोजनांसोबतच त्याविषयीच्या अंमलबजावणीत येणा:या अडचणीसाठीची माहिती घेऊन त्यासंदर्भात आपला अहवाल तयार करणार असून येत्या दोन महिन्यांच्या आत हा अहवाल सरकारला सादर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
विद्याथ्र्याना अधिक पुस्तके वाचण्याचा सराव, पुस्तके देण्याची स्पर्धा ही विविध प्रकाशन संस्थांनी आपल्या लाभासाठी सुरू केली आहे. यात या संस्थांसोबत शिक्षक, संस्थाचालकांचेही हितसंबंध दडलेले असतात. यामुळेच उठसूट कोणत्याही प्रकाशन संस्थांची पुस्तके पालकांना घेण्यास भाग पाडले जाते. समिती झाली असली तरी शिक्षण मंडळाच्या पुस्तकांच्या पलीकडे जाऊन खासगी प्रकाशनाच्या अवास्तव पुस्तकांवर वचक बसविणो गरजेचे आहे.
- प्रा. बाळासाहेब साळवे, शिक्षणतज्ज्ञ
दप्तरांच्या ओङयामुळे शाळेत जाणा:या मुलांमध्ये पाठीच्या दुखण्यात वाढ होत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. वह्या-पुस्तके, इतर साहित्यामुळे दप्तराचे वाढते वजन विद्याथ्र्यांमध्ये पाठदुखीच्या त्रसाचे कारण ठरत आहे. एकीकडे दप्तरांचे ओङो आणि दुसरीकडे मुले संगणक, मोबाइलचे खेळ यावरही अधिक वेळ घालवत असल्याने प्रत्येक 1क् मुलांच्या मागे चार ते पाच मुलांना पाठीच्या दुखण्याचा त्रस होतो. यामुळे किमान दप्तरांचे ओङो कमी असणो योग्य आहे.
- डॉ. गरिमा अनंदानी, मणकेतज्ज्ञ