शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील बिल्डर्स तणावाखाली

By admin | Updated: May 11, 2016 02:24 IST

स्वराज डेव्हलपर्सचे मालक राज खंदारी यांनी केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नांमुळे नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या ऐरणीवर आल्या आहेत.

नामदेव मोरे, नवी मुंबई स्वराज डेव्हलपर्सचे मालक राज खंदारी यांनी केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नांमुळे नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या ऐरणीवर आल्या आहेत. पुनर्विकासासह नैना परिसरात बिल्डरांची अडवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे. सिडकोसह महापालिका वेळेत परवानगी देत नाही. अर्थकारणासाठी राजकीय हस्तक्षेप वाढत आहेत. प्रकल्पामध्ये अडथळे आणण्याचे प्रमाणही वाढत असल्यामुळे बांधकाम व्यवसायिक तणावाखाली आहेत. ठाण्यामधील सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर बांधकाम व्यावसायिकांची प्रशासन व राजकारण्यांकडून अडवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले होते. प्रस्तावित विमानतळ, नैना क्षेत्र, सिडकोमुळे बांधकाम व्यवसायाला सर्वात चांगली संधी नवी मुंबईमध्ये आहे. देशातील व राज्यातील नामांकित बिल्डर या ठिकाणी गुंतवणूक करू लागले आहेत. नागरिकांना स्वस्त दरामध्ये घर उपलब्ध होण्यासाठी शासनाने बांधकामांच्या परवानग्या वेळेत मिळाव्या व या व्यवसायासमोरील अडवणी सोडविणे आवश्यक आहे. परंतु हा व्यवसाय व व्यावसायिक अडचणीत येईल, अशी धोरणे आखली जात असल्याचे स्वरात डेव्हलपर्र्सच्या राज खंदारी यांच्या आत्महत्येमुळे स्पष्ट झाले आहे. शासनाने विमानतळ प्रभावित क्षेत्रामध्ये (नैना) योग्य नियोजन करण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविली आहे. सिडकोला अधिकार मिळून तीन वर्षे झाली. या कालावधीमध्ये व्यावसायिकांनी तब्बल २५१ प्रकल्प मंजुरीसाठी सिडकोकडे सादर केले आहेत. परंतु प्रत्यक्षात २९ प्रकल्पांनाच परवानगी देण्यात आली आहे. कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याचे कारण देऊन उर्वरित परवानग्या थांबविण्यात आल्या आहेत. सिडको अडवणूक करीत असल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिक करू लागले आहेत. सिडकोच्या माहितीप्रमाणे तीन वर्षांत २९ म्हणजे वर्षाला सरासरी १० प्रकल्पांना परवानगी दिली जात असेल तर विकास कसा होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या परिसरामध्ये जमीन खरेदी करण्यापासून प्रकल्प उभारणीसाठी व्यावसायिकांनी करोडो रुपयांचे कर्ज घेतले आहे. अनेकांनी परवानगी वेळेत मिळेल या आशेने ग्राहकांकडून बुकिंग घेतली आहे, परंतु दिरंगाईमुळे सर्व नियोजनच रखडले आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्येही व्यावसायिकांची अडवणूक सुरूच आहे. शहरात बांधकामासाठी भूखंड कमी राहिले आहेत. पुनर्विकासातूनच जमीन व नवीन घरे निर्माण होणार आहेत. शासनाने मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी फेब्रुवारी २०१६ मध्ये अडीच एफएसआय मंजूर केला आहे. यामुळे धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अल्पसा दिलासा मिळाला होता. वाशी व नेरूळमध्ये जवळपास १० प्रकल्पांना मंजुरीसाठी अर्ज नगररचना विभागाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु एक वर्षामध्ये अद्याप एकही परवानगी देण्यात आलेली नाही. यामुळे पुनर्विकासामध्ये गुंतवणूक करणारे व्यावसायिक व धोकादायक इमारतीमध्ये राहणारे नागरिक दोघेही असुरक्षित झाले आहेत. अशीच स्थिती राहिली तर बांधकाम व्यावसायिकांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्यायच राहणार नसल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली आहे. > महापालिका क्षेत्रामध्ये जुन्या इमारतींच्या पुनर्विकास मोठ्या प्रमाणात होणार आहे. यामधील अर्थकारणामुळे वर्षभरापुर्वी व्यवसायीकांकडे काही शक्ती ३० टक्के वाटा मागत असल्याची चर्चा सुरू होती. नगरसेवक किशोर पाटकर यांनी मनपा सभागृहातही याचे सुतोवाच केले होते. याशिवाय श्रेय व अर्थकारणासाठी प्रकल्पांना मंजूरी मिळू न देण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. > सिडकोने नयना क्षेत्रामधील प्रकल्प रखडविले असून त्यामुळेच खंदारी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची टिका केली आहे. परंतू सिडकोचे नैना प्रकल्पाचे अतिरिक्त मुख्य नियोजक व्ही. वेणू गोपाल यांनी आरोप फेटाळले आहेत. स्वराज डेव्हलपर्सने १३ मार्च २०१५ मध्ये नैना मधील वाकडी गावात ४१ हजार १७० चौरस मिटर क्षेत्रफळावर अकृषक परवान्यासाठी अर्ज केला होता. अर्जदाराने जुलै ते सप्टेंबर दरम्यान चारवेळा अर्ज केला. परंतु परवानगीपुर्वीच स्टिल्ट अधिक तिन मजले एवढे बांधकाम केले होते. बांधकामाच्या आराखड्यात बदल सुचविले होते. परंतू प्रत्यक्षात अर्ज सादर झाला नसल्याचे स्पष्ट केले. > लालफीतशाही थांबवानयनासह नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये बिल्डरांची अडवणूक करण्याचे धोरण आखले जात आहे. सहजासहजी बांधकाम परवानगी दिली जात नाही. प्रकल्प रखडविल्याने त्यावरील खर्च वाढत आहे. विकासकाने घेतलेल्या व्याजाचे हप्ते फेडताना तारेवरची कसरत करावी लागत असून लालफितशाही कारभार थांबविण्याची मागणी केली जात आहे.