शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोकडून मालमत्तांचे होणार संगणकीकरण

By admin | Updated: July 13, 2016 02:16 IST

संपादित केलेल्या सर्व जमिनींच्या सातबाऱ्यावर आपले नाव चढविण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सिडकोने आता विविध प्रयोजनांसाठी वितरीत केलेल्या सर्व

कमलाकर कांबळे,  नवी मुंबई संपादित केलेल्या सर्व जमिनींच्या सातबाऱ्यावर आपले नाव चढविण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सिडकोने आता विविध प्रयोजनांसाठी वितरीत केलेल्या सर्व मालमत्तांचे संगणकीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या माध्यमातून कोणता भूखंड कोणाला व कोणत्या प्रयोजनासाठी वितरीत केला आहे, याचा अद्ययावत तपशील संगणकाच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. नवी मुंबईची उभारणी करण्यासाठी राज्य शासनाने सिडकाच्या माध्यमातून ठाणे, पनवेल आणि उरण तालुक्यातील ३४३.७ चौरस किलोमीटरचा भूभाग संपादित केला. शहराची निर्मित्ती करताना सिडकोने विविध प्रयोजनांसाठी भूखंडांचे वाटप केले आहे. यात गृहनिर्माण संस्थांसह शैक्षणिक संस्था, रुग्णालये, सामाजिक व सांस्कृतिक संस्था, मार्केट्स, व्यावसायिक गाळे आदींचा समावेश आहे. तसेच शहर नियोजनाचा एक भाग म्हणून नोडनिहाय क्रीडांगणे आणि उद्यानासाठी भूखंड आरक्षित केलेले आहेत. सामाजिक उपक्रमांसाठी राखीव असलेले अनेक भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित केले आहेत. तसेच मागील २५ वर्षांत साडेबारा टक्के योजनेअंतर्गत हजारो भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. हे सर्व भूखंड ६0 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर वितरीत करण्यात आले आहेत. त्यामुळे वितरीत केलेल्या या भूखंडांचा विद्यमान लीज होल्डरसह अद्ययावत तपशील उपलब्ध करण्याचा सिडकोचा मानस आहे. त्यानुसार सिडकोच्या संबंधित विभागाने कोणत्या नोडमध्ये किती व कोणत्या प्रयोजनासाठी भूखंड वितरीत केले आहेत, त्याचे सुरुवातीचे लीजहोल्डर कोण होते, सध्या ते कोणाच्या नावे हस्तांतरित झाले आहे, याचा तपशील गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया किचकट असल्याने ती पूर्णत्वास येण्यास मोठा कालावधी लागणार आहे. असे असले तरी सिडकोने ही जोखीम पत्करली असून, पुढील काही वर्षांत भूखंडांचा अद्ययावत डेटा संगणकाच्या एका क्लिकवर नागरिकांना उपलब्ध होईल, असा विश्वास सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी व्यक्त केला आहे. सिडकोने खासगी शेतीच्या १५ हजार हेक्टरसह वन आणि शासकीय मालकीच्या जमिनी संपादित केल्या आहेत. वन आणि शासकीय जमिनीच्या सातबाऱ्यांवर सिडकोचे नाव पडले आहे. परंतु शेतकऱ्यांकडून संपादित केलेल्या जागेच्या सातबाऱ्यावर मात्र आतापर्यंत मूळ मालकाचेच नाव होते. या पार्श्वभूमीवर संपादित केलेल्या जवळपास १५ हजार हेक्टर जागेच्या सातबाऱ्यावर सिडकोचे नाव टाकण्याचे महत्त्वपूर्ण काम सिडकोने पूर्ण केले आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित केलेल्या ७६१ हेक्टर जमिनीचा सातबाराही सिडकोने आपल्या नावावार करून घेतला आहे. त्यापाठोपाठ भूखंडांच्या भाडेपट्ट्याचा तपशील संकलित करण्याची मोहीम सिडकोने हाती घेतली आहे. त्यामुळे एखादा भूखंड पूर्वी कोणाच्या नावावर होता आणि सध्या कुणाच्या नावे हस्तांरित आहे, ही माहिती नागरिकांना सहजरीत्या उपलब्ध होणार आहे.