नवी मुंबई : महानगरपालिकेच्या २०२४ कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पास महासभेने रात्री १०.३० वाजता मंजुरी दिली. यावेळी विरोधी पक्षातील फक्त चारच नगरसेवक उपस्थित होते. सत्ताधारी राष्ट्रवादीनेही घाईगडबडीत अर्थसंकल्प मंजुर केला. पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी १९७५ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प स्थायीसमितीमध्ये सादर केला होता. स्थायी समितीने ११ कोटी रूपयांची वाढ सुचवून १९८७ कोटीरूपयांचा अर्थसंकल्प सभापती नेत्रा शिर्के यांनी महासभेत सादर केला होता. दोन दिवस चर्चा केल्यानंतर शनिवारी रात्री १०.३० अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. महासभेने ३६ कोटी रूपयांची वाढ केल्यामुळे २०१६-१७ चा अर्थसंकल्प २०२४ कोटी रूपयांचा झाला आहे. दोन दिवस सभा उशिरा सुरू झाल्यामुळे अनेक सदस्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. शिवसेना-भाजपा सदस्यांनी अर्थसंकल्प वास्तववादी नसल्याची टिका केली. पालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. राष्ट्रवादीने आरोप खोडून काढत विरोधकांना गांभीर्य नसल्याने ते ेशेवटपर्यंत थाबले नसल्याची टिका केली. सभा उशिरापर्यंत सुरू राहिल्याने नगरसेविकांनी नाराजी व्यक्त केली.
२०२४ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर
By admin | Updated: March 6, 2016 02:50 IST