शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

महापालिकेचे १० हजार कोटींचे उत्पन्न

By admin | Updated: August 31, 2015 03:31 IST

एलबीटी रद्द झाल्यामुळे महापालिकेपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. उत्पन्न घटले असले तरी पालिकेची मालमत्ता कमी झालेली नाही. दोन दशकांच्या काळात तब्बल

नामदेव मोरे,नवी मुंबईएलबीटी रद्द झाल्यामुळे महापालिकेपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. उत्पन्न घटले असले तरी पालिकेची मालमत्ता कमी झालेली नाही. दोन दशकांच्या काळात तब्बल १०,६४९ कोटी रुपयांचा महसूल जमा केला असून तो विविध कामांवर खर्च केला आहे. पालिकेच्या ताब्यात मोरबे धरणासह तब्बल १५६३ मालमत्ता असून त्यांची किंमत जवळपास १५ हजार कोटी रुपयांची आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये सेस व नंतर एलबीटीचा मोठा वाटा होता. शासनाने एलबीटी रद्द केल्यामुळे पालिकेपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या अनावश्यक कामांमुळे तब्बल १२९५ कोटींचा स्पील ओव्हर तयार झाला आहे. याशिवाय जवळपास एक हजार कोटींच्या कामांचा कार्यादेश देणे शिल्लक आहे. पुढील वर्षभरामध्ये १४०० कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. पालिकेवर तब्बल ८५३ कोटी ७३ लाख रुपयांचे कर्ज आहे. शासनाने अनुदान वेळेत दिले नाही तर पुढील किमान एक ते दोन वर्षे अनावश्यक खर्च बंद करावा लागणार आहे. जी कामे अत्यंत आवश्यक आहेत तीच करावी लागणार आहेत. पैशांचा अत्यंत काटेकोर वापर करावा लागणार आहे. महापालिकेने सुरू असलेली कामे पूर्ण करण्यावर लक्ष देण्याचे निश्चित केले असून नवीन कामे काढली जाणार नसल्याचे सूतोवाच केले आहे. मागील दोन वर्षामध्ये कामांचे योग्य नियोजन झाले नसल्यामुळे स्पील ओव्हर वाढत चालला आहे. पालिकेचा कोणताही महत्त्वाचा प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाही. प्रकल्प रखडल्यामुळे त्यांची रक्कम दुप्पट होवू लागली असून त्यामुळे आर्थिक गणित बिघडले आहे. पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला असला तरी महापालिका पूर्णपणे आर्थिक दिवाळखोरीमध्ये गेल्याचे चित्र नाही. महापालिकेने विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सादर केलेल्या आर्थिक ताळेबंदातून पालिकेची चांगली व वाईट दोन्ही बाजू समोर आल्या आहेत. मागील वीस वर्षांमध्ये पालिकेने विविध मार्गांनी जब्बल १०,६४९ कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. या महसुलाच्या माध्यमातून मोरबे धरण, ४३८ किलोमीटर लांबीचे रस्ते, मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण, शाळा, समाजमंदिर, स्कायवॉक, २०० उद्याने, क्रीडांगणे व इतर अशा एकूण १५६३ मालमत्ता उभ्या केल्या आहेत. फक्त मोरबे धरण परिसरात पालिकेच्या ताब्यात १८०० एकर जमीन आहे. 7.62 लाख चौरस मीटर क्षेत्रफळावर उद्याने विकसित केली आहेत. पालिकेच्या एकूण मालमत्तांची एकूण रक्कम १५ हजार कोटींपेक्षा जास्त झाली आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढविले नाहीत तर भविष्यात आर्थिक घडी बिघडण्याची शक्यता आहे. शहरवासीयांना चांगली आरोग्य सुविधा देण्यात अपयश मुख्यालयासह सर्व महत्त्वाचे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात अपयशचुकीच्या नियोजनामुळे मोठ्या प्रकल्पांचा खर्च दुप्पट मलनिस्सारण केंद्रातील शुद्ध केलेल्या पाण्याची विक्री करण्यास अपयश गरज नसताना रस्ते व पदपथांची वारंवार दुरूस्ती व नवीन कामे समाजमंदिर,मार्केट व इतर इमारतींचा वापर नाहीपाणी मुबलक असल्यामुळे मोठ्याप्रमाणात उधळपट्टीपालिकेच्या कारभाराला आर्थिक शिस्त नाहीजाहिरात, परवाना व इतर विभागांचे उत्पन्न वाढविण्याकडे दुर्लक्ष मालमत्ता कराची गळती थांबविण्याकडेही दुर्लक्ष शहरवासीयांना चांगली वाहतूक सुविधा देण्यात एनएमएमटीला अपयश