शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशन अल्पावधीचे राहणार

By admin | Updated: November 3, 2015 02:10 IST

अनेक मुद्दे आणि विधेयकांना असलेला विरोधकांचा प्रखर विरोध आणि कामकाज सुरळीतपणे चालविणे कठीण जाण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने संसदेचे हिवाळी अधिवेशन विलंबानेच

- हरीश गुप्ता,  नवी दिल्लीअनेक मुद्दे आणि विधेयकांना असलेला विरोधकांचा प्रखर विरोध आणि कामकाज सुरळीतपणे चालविणे कठीण जाण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने संसदेचे हिवाळी अधिवेशन विलंबानेच बोलावण्याची योजना आखली आहे. साऊथ ब्लॉकमधून मिळालेले वृत्त खरे असेल तर हिवाळी अधिवेशन पूर्वी ठरल्याप्रमाणे १९ नोव्हेंबरऐवजी २६ नोव्हेंबरपासून प्रारंभ होईल आणि ते अल्पावधीचे राहील.१९ नोव्हेंबर रोजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती असल्याकारणाने त्या दिवसापासून संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलावण्यात येऊ नये, अशी विनंती काँग्रेसने केली होती. पंतप्रधान २१ नोव्हेंबरपासून तीन दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे २० नोव्हेंबरपासून अधिवेशन बोलावल्यास त्यातून कसलाही उद्देश साध्य होणार नाही. त्याशिवाय बिहार, उत्तर प्रदेशचा काही भाग आणि अन्य राज्यांत १७ नोव्हेंबरला छटपूजा उत्सव असल्याने सोमवारी १६ नोव्हेंबरपासूनही अधिवेशन बोलावले जाऊ शकणार नाही. परिणामी २६ नोव्हेंबरपासूनच अधिवेशन घेण्याबाबत सरकार फेरविचार करीत आहे. हिवाळी अधिवेशन २६ नोव्हेंबरपासून सुरू झाले तर ते ख्रिसमस आणि नववर्ष सोहळ्यामुळे लवकर संस्थगित करावे लागेल आणि असे झाले तर या अधिवेशनात केवळ २२ दिवसांचेच कामकाज चालू शकेल. संसदेच्या कामकाजावर अर्थातच बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा प्रभाव पाहायला मिळेल. ८ नोव्हेंबरला हे निकाल जाहीर होणार आहेत.दरम्यान, संसदीय कामकाजावरील कॅबिनेट कमिटीने (सीसीपीए) २६ आॅक्टोबर रोजी बैठक घेऊन राज्यसभेत प्रलंबित असलेल्या ५३ विधेयकांचा आढावा घेतला. दादरी हत्याकांड, गोमांस बंदी आणि संबंधित मुद्यांसह नुकत्याच उफाळलेल्या सांप्रदायिक हिंसाचारावरून रालोआ सरकारविरुद्ध कपात प्रस्ताव आणण्याची विरोधकांची योजना आहे.आगामी अधिवेशनात आपला आर्थिक सुधारणांचा अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न सरकार करू शकते; परंतु जीएसटी विधेयक पारित होण्याचा मार्ग मोकळा करणारी घटना दुरुस्ती पारित करण्यासाठी मतैक्य होण्याची शक्यता मात्र कमी आहे. अतिशय महत्त्वाचे हे विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनातच पारित होईल, अशी अपेक्षा होती. पण सरकारला मतैक्य तयार करण्यात अपयश आले आणि हे विधेयक पुन्हा बारगळले.