शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

पंजाबमध्ये कौन बनेगा मुख्यमंत्री?

By admin | Updated: January 17, 2017 05:25 IST

नवज्योत सिंग सिद्धू यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर पंजाबमधील या पक्षातील मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा चर्चेला आला

व्यंकटेश केसरी,

नवी दिल्ली- नवज्योत सिंग सिद्धू यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर पंजाबमधील या पक्षातील मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा चर्चेला आला आहे. कारण, या पदासाठी आपण शर्यतीत आहोत याला सिद्धू यांनी नकार दिला नाही, तर पक्ष नेतृत्व यावर निर्णय घेईल, असा षटकारही त्यांनी लगावला. तथापि, काँग्रेस ‘कौसल्या’, तर भाजप ‘कैकयी’ आहे अशी तुफान फटकेबाजीही त्यांनी केली. याच मुद्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नावर सिद्धू म्हणाले की, ‘गेहू खेत में, बेटा पेट में और तुम ब्याह की तैयारी कर रहे हो.’ दरम्यान, राजकारणात जर तर याला काही स्थान नाही. ‘जर, परंतु’ आता विसरा. फक्त सिद्धू ‘जाट’लक्षात ठेवा अशी फिरकीही त्यांनी घेतली. मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असलेले पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग यांच्याशी तुलनेचा प्रश्न उपस्थित केला असता सिद्धू म्हणाले की, जर बिहारमध्ये लालूप्रसाद आणि नितीशकुमार एकत्र येऊ शकतात, तर पंजाबमध्ये मी आणि अमरिंदर सिंग का नाही? काँग्रेस हायकमांडने सांगितले तर आपण कुणाच्याही नेतृत्वात काम करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या दुसऱ्या दिवशी येथे पक्ष मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सिद्धू यांनी शेरोशायरी करीत कार्यक्रमात हास्याचेही फवारे उडविले. या निवडणुकीत अकाली दल हेच प्रमुख प्रतिद्वंद्वी असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांना महत्त्व नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मोदींबाबत विचारले असता ते म्हणाले की, पंतप्रधानांबाबत तर जनताच काय ते बोलेल. काँग्रेस हे आपले मूळ आहे हे सांगणाऱ्या सिद्धू यांना मात्र याचा खुलासा करता आला नाही की, या मूळ पक्षात येण्यास एवढा उशीर का केला. आपसोबत चर्चा करण्यातही त्यांचा बराच वेळ गेला; पण केजरीवाल यांचा हवाला देऊन ते म्हणाले, त्यांनी तर सांगितले होते की, ‘सिद्धू यांनी मला काहीही मागितले नाही.’ >हल्लाबोलसिद्धू यांनी भाजपचा उल्लेख ‘कैकयी’ असा केला, तर काँग्रेसला ‘कौसल्या’ असे संबोधले. (रामाची सावत्र आई आणि आई) ते म्हणाले की, मी पक्षाला आई समजतो; पण आई तर कैकयीसुद्धा होती. जी वनवासाला पाठवत होती; पण माता कौसल्या पुन्हा बोलावून सत्ता देते. आता कैकयी कोण आणि कौसल्या कोण, ते आपणच ठरवा.षडयंत्र करणारी ‘मंथरा’ कोण आहे? असा सवाल केला असता ज्या पक्षाने बाहेर पडण्यास भाग पाडले, त्या भाजपवर सिद्धू यांनी पुन्हा हल्लाबोल केला. आपण जन्मत:च काँग्रेसचे आहोत. आपले वडील सरदार भवंतसिंग सिद्धू यांनी ४० वर्षे काँग्रेसमध्ये काम केले. ते विधानसभा, विधान परिषदेचे सदस्यही होते. ब्रिटिश सरकारविरुद्ध त्यांनी संघर्ष केला होता, असेही ते म्हणाले.