शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले
2
'ट्रम्प यांच्या टॅरिफ'ला धक्का बसणार ! जपानमधील मेगा डीलनंतर पंतप्रधान मोदी चीनला पोहोचले
3
Nagpur Girl Stabbed: एका दिवसाची आईची साथ सुटली अन् एंजेल नेहमीसाठीच दुरावली!
4
फोनवरील 'तो' संवाद अन् ट्रम्प यांचा प्लॅन फसला; भारत-अमेरिका संबंध कसे बिघडले? सर्वात मोठा खुलासा
5
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत चर्चा सुरू, न्या. शिंदे, विभागीय आयुक्त उपोषणस्थळी दाखल
6
बदलीमुळे अभियंता संतापला, रागाच्या भरात पाणीपुरवठा खंडित केला; सत्य आले समोर
7
"...तसं झाल्यास आरक्षणाचा प्रश्न निश्चित सुटेल", शरद पवारांचे मराठा आरक्षणाबद्दल केंद्राकडे बोट
8
‘कोणीच कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो', अमेरिकन टॅरिफवरुन राजनाथ सिंह यांचे मोठे विधान
9
Manoj Jarange Patil: शिंदे समितीने मनोज जरांगेंची घेतली भेट, आझाद मैदानातील उपोषणस्थळीच चर्चा
10
Gauri Pujan 2025: तुमच्या घरी गौरी गणपती असतील तर नैवेद्याच्या वेळी पडदा लावता ना? कारण...
11
Asia Cup 2025 सुरू होण्याआधीच आली मोठी अपडेट; IND vs PAK सामन्यावरही होणार परिणाम
12
EPF Rules Update: आता सहा महिने नाही, तर महिनाभर नोकरी केली तरी मिळणार पेन्शन
13
प्रेमप्रकरणावरून संतापलेल्या बापानं पोटच्या मुलीलाच संपवलं, मग आत्महत्या दाखवण्यासाठी भलतंच नाटक रचलं; पण...
14
आशिया कप स्पर्धेआधी शाहीन शाह आफ्रिदीनं साधला मोठा डाव; जगात भारी असलेल्या बुमराहला केलं ओव्हरटेक
15
"आता तुमची राजकीय इच्छाशक्ती अरबी समुद्रात बुडाली का?; दोन समाजात आगी लावून...!" संजय राऊतांचा फडणीसांवर थेट हल्ला
16
Raj Thackeray: मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन; राज ठाकरेंनी एका वाक्यातच दिलं उत्तर, कुणाला धरलं धारेवर?
17
Gauri Pujan 2025: गौरीचा धागा व्यक्तिला आणि वास्तुला बांधण्याने होणारे लाभ माहीत आहेत का?
18
मराठा समाजाचा OBC मध्ये समावेश होणार नाही, कारण...; भाजपा आमदार परिणय फुकेंची जरांगेंवर टीका
19
Video: NEET ची तयारी करणारी विद्यार्थिती कोचिंग सेंटरच्या छतावर चढली अन्...
20
Gauri Pujan 2025: मुखवट्याच्या गौरी सोडून खड्यांच्या गौरी पूजण्याचे काय आहे कारण? वाचा

NSG म्हणजे काय?

By admin | Updated: June 9, 2016 14:04 IST

भारताला अणूतंत्रज्ञान मिळू नये हा उद्देश NSG च्या स्थापनेमागे होता. 1975 ते 1978 या कालावधीत लंडनमध्ये अनेक बैठका पार पडल्या

योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - गेली अनेक वर्षे भारत NSG किंवा न्युक्लिअर सप्लाइज ग्रुपमध्ये स्थान मिळवण्यासाठी झटत आहे. अमेरिकेपाठोपाठ मेक्सिकोनेही भारताला या ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यासाठी पाठिंबा दर्शवला आणि भारताचं आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्व अधोरेखीत झालं. काय आहे NSG? आणि भारतासाठी हा ग्रुप का महत्त्वाचा आहे हे जाणुन घेऊया...
 
भारतच कारणीभूत हा ग्रुप बनण्यासाठी!
 
 
1974 मध्ये भारताने अणू चाचणी केली आणि त्या नंतर अमेरिका, रशिया, कॅनडा, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, जपान आणि इंग्लंड या सात देशांनी न्युक्लिअर सप्लाइज ग्रुप स्थापन केला. या समूहाचा उद्देश होता, अणू तंत्रज्ञान आणि आण्विक शस्त्रास्त्रांच्या प्रसाराला आळा घालणे. मुख्यत: भारताला अणूतंत्रज्ञान मिळू नये हा उद्देश NSG च्या स्थापनेमागे होता. 1975 ते 1978 या कालावधीत लंडनमध्ये अनेक बैठका पार पडल्या आणि कशाची निर्यात कुठल्या देशाला करता येईल, कुणाला करता येणार नाही आदी बाबींवर निर्णय घेण्यात आले. त्यानंतर 1991 पर्यंत NSG ची बैठक झाली नाही.
1991 च्या पहिल्या आखाती युद्धानंतर हा ग्रुप पुन्हा सक्रिय झाला. आजच्या घडीला या ग्रुपमध्ये 48 सदस्य देश असून बहुतांश देश युरोपीय खंडातले असून चीन, ऑस्ट्रेलिया व कोरिया सारखे देश आशिया खंडातले आहेत तर ब्राझिलसारखे मोजके देश लॅटिन अमेरिकेतले आहेत.
पाकिस्तान व भारत आता मुख्यत: या महत्त्वाच्या ग्रुपमध्ये सामील होण्यास उत्सुक आहेत. चीनचा भारताला विरोध तर पाकिस्तानला पाठिंबा आहे.
 
काय वैशिष्ट्य आहे या 48 देशांचं?
 
NSG चे 48 सदस्य देश जे आहेत, त्यामध्ये अण्वस्त्रधारी देश अशी ज्यांची ओळख आहे असे पाच देश आहेत, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, चीन आणि रशिया. तर उर्वरीत 43 देशांनी NPT म्हणजे न्युक्लिअर नॉनप्रोलिफरेशन ट्रिटीवर किंवा अण्वस्त्रप्रसार बंदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
हा करार अन्यायकारक असल्याचे सांगत आजपर्यंत भारताने या करारावर सही करण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळेच भारताचा NSG मध्ये प्रवेशाचा मार्ग बंद होता.
 
NPT वर सही न केल्यामुळेच अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना संपूर्ण जगाचा रोष पत्करून भारत आणखी एक अणूचाचणी करू शकला.
 
 
भारतासाठी दरवाजे का उघडले?
 
जरी NPT वर सही केली नसली तरी 2008 मध्ये भारताने अमेरिकेशी 2008 मध्ये नागरी अणू करार केला आणि आण्विक शक्तिचा वापर शांततेसाठी करण्याची, नागरी अणू कार्यक्रम आणि लष्करी अणू कार्यक्रम वेगळे ठेवण्याची ग्वाही दिली. याबरोबरच भारताचा 1974 पासूनचा सन्माननीय इतिहास बघता - ज्यामध्ये भारताने विकसित केलेले तंत्रज्ञान अन्य देशांना दिलेले नाही याचा समावेश होतो - भारताबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायात विश्वास उत्पन्न झाला.
 
NSG सदस्य होण्याचे 4 महत्त्वाचे फायदे
 
1 - वैद्यकीय क्षेत्रापासून ते अणूउर्जेपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये आण्विक तंत्रज्ञान भारताला मिळू शकेल. NSG चे सदस्य असलेल्या देशांकडे अद्ययावत तंत्रज्ञान आहे जे भारतीय तंत्रज्ञानापेक्षा विकसित आहे.
 
2 - खनिज तेलांसारखी प्रदूषण वाढवणारी इंधने भारत उर्जा निर्मितीसाठी वापरतो. पर्यावरण रक्षणासाठी पर्यायी उर्जेचे प्रमाण 40 टक्के असण्याची गरज आहे. जर NSG मध्ये प्रवेश मिळाला तर भारतासाठी अणू उर्जा प्रकल्प आयात करण्याचा मार्ग अत्यंत सुलभ होणार आहे.
 
3 - अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अणू उर्जेची निर्मिती केली तर स्वस्त वीज मिळेल आणि तिचा फायदा उत्पादन क्षेत्राला तसेच भारतीय अर्थव्यवस्थेला होईल.
 
4 - भारत NPT वर सह्या करूनही हे सर्व मिळवू शकतो, परंतु तसे केल्यास भारताचा अण्वस्त्रांचा मार्ग बंद होतो. त्यामुळे NSG सदस्यत्व मिळाले तर NPT वर सही करण्याची राहणार नाही आणि लष्करासाठीचा अणू कार्यक्रमही अबाधित राहील.