नाशिक : महापालिकेच्या पूर्व विभागामधील प्रभाग क्रमांक ३८ मधील काही भागांमध्ये बुधवारी (दि.७) व गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता पाणीपुरवठा होणार आहे.कल्पतरुनगर येथील नवीन जलकुंभाच्या पाईपच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार असल्याने बुधवारी व गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता पाणीपुरवठा होणार नसून तो सकाळी साडेदहा वाजता केला जाणार आहे. प्रभागातील अशोका मार्ग, नारायण बापूनगर, लिंगायत कॉलनी, गणेश बाबानगर, हॅपी होम कॉलनी, गुलशन कॉलनी, तुलसी आय हॉस्पिटल, बजरंगवाडी भागाचा समावेश आहे.
उद्या साडेदहा वाजता पाणीपुरवठा
By admin | Updated: September 6, 2016 00:25 IST