साहित्य संमेलनाध्यक्षपदाची निवडणूकीसाठी विठठल वाघ यांचा अर्ज
By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST
पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होणा-या 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी साहित्य परिषदेच्या कार्यालयात गुरुवारी अर्ज दाखल केला. डॉ. श्रीपाल सबनीस, रविंद्र शोभणे आणि विठठल वाघ यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे आणि डॉ. शरणकुमार लिंबाळे, जनार्दन वाघमारे, यांची नावे चर्चेत असल्याने पिंपरी साहित्य संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
साहित्य संमेलनाध्यक्षपदाची निवडणूकीसाठी विठठल वाघ यांचा अर्ज
पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होणा-या 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी साहित्य परिषदेच्या कार्यालयात गुरुवारी अर्ज दाखल केला. डॉ. श्रीपाल सबनीस, रविंद्र शोभणे आणि विठठल वाघ यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे आणि डॉ. शरणकुमार लिंबाळे, जनार्दन वाघमारे, यांची नावे चर्चेत असल्याने पिंपरी साहित्य संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.संमेलनाध्यक्षपदासाठी यापूर्वी ज्येष्ठ लेखक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यापाठोपाठ वाघ यांनी पुण्यातून तर रविंद्र शोभणे यांनी विदर्भ साहित्य संघातून अर्ज भरल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे दिसते. ़ अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनील महाजन यांनी वाघ यांचा अर्ज स्वीकारला. वाघ यांच्या अर्जावर सूचक म्हणून उद्धव कानडे यांची स्वाक्षरी आहे. तर अनुमोदक म्हणून डॉ. अनु गायकवाड, मुकुंद आवटे, दिगंबर ढोकले, दत्तात्रय अत्रे आणि अँड. विकास देशमुख यांच्या स्वाक्ष-या आहेत.वाघ म्हणाले, साहित्यक्षेत्रात माझ्यापेक्षाही प्रतिभावंत लोक आहेत. त्यांना मान-सन्मान मिळाला पाहिजे. मात्र, महामंडळाच्या तांत्रिक बाबींमुळे ना. ग. देशपांडे, रा. चिं. ढेरे, ना. धों. महानोर आणि मंगेश पाडगावकर हे दिग्गज या प्रक्रियेपासून लांब राहिले. मी 40 ते 50 वर्षे या क्षेत्रात आहे. त्यामुळे सगळ्यांच्या आग्रहाखातर मी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. दुष्काळ असला तरी घरातले कार्यक्रम आपण करतो. साहित्य संमेलन हा मराठी समुदायाचा उत्सव आहे. त्यामुळे नवीन लोकांशी संपर्क होतो. वाचन कमी होत आहे, असे आपण म्हणतो. पण गेल्या काही संमेलनात पुस्तकांची विक्री कोटीच्या घरात गेली आहे. मराठीवर आक्रमणे होत आहेत. अनेक गोष्टी संमेलनातून घडत असतात. त्यामुळे संमेलने झाली पाहिजेत. संमेलनाध्यक्षपद हे साहित्यातील सर्वोच्च स्थान आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. तसेच नाशिक येथे होणा-या संमेलनाच्या वेळी केशव मेश्राम यांनी अर्ज भरला होता. त्यावेळेस त्यांच्यासाठी मी माघार घेतली होती. तेव्हा मेश्राम हे बिनविरोध अध्यक्ष झाले होते. त्यावेळेस माघार घेताना मला आनंद झाला होता.----------------------------------------------------------नेमाडेंना सर्व मिळाले : वाघ यांचा टोलासाहित्य संमेलन हा रिकामटेकडयांचा उद्योग आहे, या ज्ञानपीठविजेते साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या विधानाकडे लक्ष वेधले असता वाघ म्हणाले, डॉ. नेमाडे यांना साहित्य क्षेत्रात सगळे मिळाले आहे असा टोला त्यांनी लगावला. --------------------------------------------------------