मिर्झापूरच्या सरपंचपदी वलवे
By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST
निवड : उपसरपंचपदी वलवे
मिर्झापूरच्या सरपंचपदी वलवे
निवड : उपसरपंचपदी वलवे संगमनेर : तालुक्यातील मिर्झापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संगीता वलवे तर उपसरपंचपदी शंकर वलवे यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. मिर्झापूर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत शेतकरी विकास मंडळाने सर्व जागा जिंकून सत्ता प्रस्थापीत केली. शुक्रवारी सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी झाल्या. निवडणूक निर्णय अधिकारी एच.एम.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सरपंचपदी संगीता वलवे तर उपसरपंचपदी शंकर वलवे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचीत पदाधिकार्यांचे माजीमंत्री आ.बाळासाहेब थोरात, आ.डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, थोरात कारखान्याचे संचालक पांडूरंग घूले, सत्यजीत तांबे, रणजीत देशमुख यांनी अभिनंदन केले आहे. (वार्ताहर) फोटो-२८संगीता वलवेफोटो-२८शंकर वलवे