२५ टक्के प्रवेश प्रक्रिया आजपासून
By admin | Updated: April 5, 2016 00:14 IST
जळगाव- खाजगी किंवा इतर शाळांमध्ये नर्सरी किंवा पहिलीमध्ये आर्थिक दुर्बल घटकांच्या पाल्यांना नि:शुल्क प्रवेश मिळावा यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. या २५ टक्के कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी आर्थिक दुर्बल पालकांना ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. हे अर्ज आरटीई २५ ॲडमिशन डॉट महाराष्ट्र डॉट गोव्ह डॉट इन या संकेतस्थळावर करायचे आहेत. ५ ते १५ एप्रिल या दरम्यान या संकेतस्थळावर अर्ज करता येतील.
२५ टक्के प्रवेश प्रक्रिया आजपासून
जळगाव- खाजगी किंवा इतर शाळांमध्ये नर्सरी किंवा पहिलीमध्ये आर्थिक दुर्बल घटकांच्या पाल्यांना नि:शुल्क प्रवेश मिळावा यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. या २५ टक्के कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी आर्थिक दुर्बल पालकांना ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. हे अर्ज आरटीई २५ ॲडमिशन डॉट महाराष्ट्र डॉट गोव्ह डॉट इन या संकेतस्थळावर करायचे आहेत. ५ ते १५ एप्रिल या दरम्यान या संकेतस्थळावर अर्ज करता येतील. ऑनलाईन प्रवेश देण्यासंबंधी जिल्हाभरातील २३३ शाळांनी शासनाच्या संकेतस्थलावर आपली माहिती नोंदणी करून दिली आहे. या शाळांमध्ये नर्सरी व पहिलीमध्ये २५ टक्के आरक्षणानुसार प्रवेश मिळेल. प्रवेश घेण्यापूर्वी आर्थिक दुर्बल असल्यासंबंधीच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.