मलेशियन मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या तिघांची निवड
By admin | Updated: May 12, 2014 22:59 IST
कोल्हापूर : मलेशिया येथे होणार्या प्रौढांच्या २८ व्या मलेशियन मास्टर्स इंटरनॅशनल ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी कोल्हापुरातील आकाराम शिंदे, गोरखनाथ केकरे, सतीश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धा २८ मे ते ३ जूनअखेर होणार आहेत.
मलेशियन मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या तिघांची निवड
कोल्हापूर : मलेशिया येथे होणार्या प्रौढांच्या २८ व्या मलेशियन मास्टर्स इंटरनॅशनल ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी कोल्हापुरातील आकाराम शिंदे, गोरखनाथ केकरे, सतीश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धा २८ मे ते ३ जूनअखेर होणार आहेत. या स्पर्धेसाठी राज्यातून एकूण ११ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. याकामी मास्टर्स ॲथलेटिक्स असोसिएशन महाराष्ट्राचे सचिव डॉमनिक सॅव्हीवो यांनी सहकार्य केले आहे, तर निवड झालेल्या खेळाडूंना कोल्हापूर मास्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्राचार्य अमरसिंह राणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या स्पर्धेसाठी सांगलीतील दत्तात्रय कदम, निवास रासकर, दिनकर नाईक यांचीही निवड करण्यात आली आहे. आकाराम शिंदे हे संघ व्यवस्थापक म्हणून या खेळाडूंसमवेत जाणार आहेत. -----------------