बँकेत तीन शेतकर्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न !
By admin | Updated: July 29, 2015 00:42 IST
परभणीतील घटना : पीक कर्ज मिळत नसल्याने हताशसेलू (जि. परभणी) : येथील स्टेट बँक ऑफ इंडियाकडून पीक कर्ज मिळत नसल्याने हताश झालेल्या तीन शेतकर्यांनी बँकेच्या कार्यालयातच अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातील राजवाडी गाव सेलू येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला दत्तक देण्यात आले आहे. राजवाडीतील संजय शेवाळे, ...
बँकेत तीन शेतकर्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न !
परभणीतील घटना : पीक कर्ज मिळत नसल्याने हताशसेलू (जि. परभणी) : येथील स्टेट बँक ऑफ इंडियाकडून पीक कर्ज मिळत नसल्याने हताश झालेल्या तीन शेतकर्यांनी बँकेच्या कार्यालयातच अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातील राजवाडी गाव सेलू येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला दत्तक देण्यात आले आहे. राजवाडीतील संजय शेवाळे, राजकिशोर जैस्वाल, भास्कर शेवाळे या शेतकर्यांनी पीक कर्ज व पुनर्गठन मिळविण्यासाठी बँकेकडे एक महिन्यापूर्वी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती. मात्र त्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ होत होती. बँकेत चकरा मारून वैतागलेल्या या शेतकर्यांनी १६ जुलैला शाखा व्यवस्थापकांना आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतरही त्यांची दखल घेण्यात आली नाही. मंगळवारी संजय शेवाळे, राजकिशोर जैस्वाल, भास्कर शेवाळे यांनी कर्ज पुनर्गठनाबाबत विभागीय अधिकार्यांशी चर्चा केली. परंतु, त्यानंतर त्यांनी अचानकपणे १२.१५ वाजेच्या सुमारास व्यवस्थापकांच्या कक्षात जाऊन बाटलीत आणलेले रॉकेल अंगावर ओतून घेतले. बँकेतील सुरक्षारक्षकांनी तातडीने या शेतकर्यांना ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. याप्रकरणी अजून कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. (वार्ताहर)