शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

स्वेच्छानिवृत्त विमा कर्मचाऱ्यांना पेन्शनवाढ नाही

By admin | Updated: January 9, 2015 02:16 IST

विमा कंपन्यांमधून २००४ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन बाहेर पडलेल्या देशभरातील कर्मचाऱ्यांनी वाढीव पेन्शनसाठी केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत.

नवी दिल्ली : भारतीय सर्वसाधारण विमा महामंडळ आणि त्याच्या अखत्यारित असलेल्या चार सरकारी सर्वसाधारण विमा कंपन्यांमधून २००४ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन बाहेर पडलेल्या देशभरातील कर्मचाऱ्यांनी वाढीव पेन्शनसाठी केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत.या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर या कंपन्यांनी डिसेंबर २००५ मध्ये कर्मचाऱ्यांना पगारवाढ लागू केली होती. ही पगारवाढ आॅगस्ट २००२ पासूनच्या पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात आली होती. या तारखेला आम्हीसुद्धा नोकरीत होतो. त्यामुळे ही पगारवाढ आम्हालाही लागू झाल्याचे मानून त्यानुसार आमच्या पेन्न्शनमध्ये वाढ केली जावी, अशी स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांची मागणी होती.कंपन्यांच्या व्यवस्थापनांनी यास नकार दिल्यानंतर स्वेच्छानिवृत्त कर्मचाऱ्यांनी देशातील विविध उच्च न्यायालयांमध्ये रिट याचिका दाखल केल्या होत्या. काही उच्च न्यायालयांनी कर्मचाऱ्यांच्या तर काहींनी कंपन्यांच्या बाजूने निकाल दिले होते. अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील एकूण १६ याचिका व अपिले स्वत:कडे वर्ग करून घेतली होती. न्या. अनिल आर. दवे आणि न्या.शिव किर्ति सिंग यांच्या खंडपीठाने या याचिका फेटाळल्या व स्वेच्छानिवृत्त कर्मचारी, त्यांच्या निवृत्तीनंतर वाढविण्यात आलेल्या पगारानुसार, वाढीव पेन्शन मिळण्यास पात्र नाहीत, असा निकाल दिला.न्यायालयाने म्हटले की, या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देताना, एरवी लागू असलेले नियम शिथिल करून, अतिरिक्त लाभ देण्यात आले होते. निवृत्ती घेऊन बाहेर पडल्यावर त्यांचा कंपनीशी संबंध राहिलेला नाही. शिवाय या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांवरील खर्च कमी करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती योजना लागू केली होती. तिचा लाभ घेतलेल्यांनाही, नंतरच्या पगरावाढीचे लाभ दिले तर मुळात स्वेच्छानिवृत्ती योजना राबविण्याचा हेतूच विफल होईल. (विशेष प्रतिनिधी)४या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देताना पुढीलप्रमाणे लाभ देण्यात आले होते.४एरवी २० वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती घेता येते. पण या योजनेत १० वर्षे सेवा झालेल्या व वयाची किमान ४० वर्षे पूर्ण झालेल्यांनाही पात्र मानले गेले.४पेन्शनचा हिशेब प्रत्यक्षात झालेल्या सेवेत पाच वर्षांची मानीव वाढ धरूनकेला गेला.पूर्ण झालेल्या सेवेच्या प्रत्येक वर्षासाठी दोन महिन्यांचा पगार किंवा शिल्लक राहिलेल्या सेवेचा पगार यापैकी जी कमी असेल ती रक्कम सानुग्रह रक्कम.याखेरीज प्रॉव्हिडन्ट फंड व ग्रॅच्युईटी.