...तर सहकार क्षेत्र शासनविरोधात
By admin | Updated: June 1, 2014 23:32 IST
देवांगण : सहकार भारती अधिवेशनाचा समारोप
...तर सहकार क्षेत्र शासनविरोधात
देवांगण : सहकार भारती अधिवेशनाचा समारोप नाशिक : शासन तसेच रिझर्व्ह बँकेच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्रास धक्का लागला तर देशातील संपूर्ण सहकार क्षेत्र शासनविरोधात उभे ठाकेल, असा इशारा सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री विजय देवांगण यांनी येथे दिला़ दादासाहेब गायकवाड सभागृह येथे सहकार भारतीच्या प्रदेश अधिवेशनात ते बोलत होते़ दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनाचा आज समारोप झाला़ देवांगण म्हणाले, रिझर्व्ह बॅँकेचा सहकार क्षेत्रात प्रमाणापेक्षा जास्त हस्तक्षेप वाढला आहे़ सहकार क्षेत्राला वाचविण्याऐवजी अडचणीत आणण्याचे काम केले जात आहे़ निर्बंधामधून सहकार क्षेत्राला संपवून खासगी आर्थिक संस्थांना प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न केले जात आहेत, हे कदापी सहन केले जाणार नाही़ सहकार वाचविण्यासाठी संघटनेच्या नियमांप्रमाणे संघटन वाढविणे आवश्यक आहे़ विधानसभा निवडणुकीनंतर सहकार क्षेत्राच्या निवडणुका होत आहेत़ यामध्ये योग्य नियोजन करून सर्वसामान्यांचा विकास व उद्धारासाठी वर्चस्व वाढविणे आवश्यक आहे़ यासाठी आता सहकार भारतीच्या विविध सेलची स्वतंत्र अधिवेशने घेण्यात येणार आहेत़ महिलांचा सहकारात सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे़ आज क्रेडिट सोसायट्या वाचविण्यासाठी फे डरेशनची गरज आहे, यासाठी सहकार भारतीचे प्रयत्न सुरू आहेत़ यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले़ तत्पूर्वी झालेल्या चर्चासत्रात अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर यांनी देशाची आर्थिक स्थिती, जागतिक अर्थकारणाचे परिणाम, रुपया मजबूत करण्यासाठीच्या उपयोजना, शेअर बाजारातील चढ-उतार व एकूण अर्थकारणात सहकाराचा प्रभाव याविषयी विवेचन केले़ याप्रसंगी सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मराठे, अधिवेशनाचे अध्यक्ष संजय बिर्ला, सहकार भारतीचे सरचिटणीस शिवाजीराव पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ़ शशी आहिरे, प्रभाकर देशमुख, परमानंद गुजराथी, अजय ब्रोचा, अशोक जुनागडे आदि उपस्थित होते़ चौकट देवांगण यांची नाराजी सहकार भारतीच्या दोनदिवसीय अधिवेशनास राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर सभासदांची नोंदणी झाली होती़ पहिल्या दिवशी बर्यापैकी गर्दी असली तरी दुसर्या दिवशी बहुतांश सभासदांनी देवदर्शनास जाणे पसंत केल्याने सभागृह ओस पडले होते़ संघटनाबाबतच्या महत्त्वपूर्ण चर्चासत्रास कमी उपस्थिती असल्याने देवांगण यांनी आपली नाराजी व्यक्त केली़ फ ोटो क्ऱ - 01पीएचजेएन138फ ोटो ओळी - सहकार भारतीच्या अधिवेशन समारोपप्रसंगी बोलताना विजय देवांगण़ समवेत डावीकडून शिवाजीराव पाटील, डॉ़ शशी आहिरे, संजय बिर्ला, सतीश मराठे, प्रभाकर देशमुख आदि.