नदीपात्रातील रस्ता उखडण्यासाठी पालिका काढणार निविदा
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
पुणे ळ वारजे ते विठठलवाडी रस्त्याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने दिलेला रस्ता काढून टाकण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याने हा रस्ता पुढील सहा महिन्यात पालिकेस बंधनकारक बनले आहे. हे काम महापालिकेकडे असलेल्या यंत्रणेद्वारे करणे शक्य नसल्याने त्यासाठी स्वतंत्र ठेकेदार नेमून हा रस्ता काढण्यात येणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रीया राबविण्याचे आदेश महापालिका प्रशासनाकडून पथ विभागास देण़्यात आले आहेत. या शिवाय या रस्त्याची पूररेषेची आखणी करून देण्याची मागणीही महापालिकेने पाटबंधारे विभागास दिलेली असल्याची माहिती पालिकेतील एका वरिष्ट अधिका-याने दिली.
नदीपात्रातील रस्ता उखडण्यासाठी पालिका काढणार निविदा
पुणे ळ वारजे ते विठठलवाडी रस्त्याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने दिलेला रस्ता काढून टाकण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याने हा रस्ता पुढील सहा महिन्यात पालिकेस बंधनकारक बनले आहे. हे काम महापालिकेकडे असलेल्या यंत्रणेद्वारे करणे शक्य नसल्याने त्यासाठी स्वतंत्र ठेकेदार नेमून हा रस्ता काढण्यात येणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रीया राबविण्याचे आदेश महापालिका प्रशासनाकडून पथ विभागास देण़्यात आले आहेत. या शिवाय या रस्त्याची पूररेषेची आखणी करून देण्याची मागणीही महापालिकेने पाटबंधारे विभागास दिलेली असल्याची माहिती पालिकेतील एका वरिष्ट अधिका-याने दिली. या रस्त्याच्या कामासाठी ब्लू लाईनमध्ये भराव टाकण्यात आला होता. यामुळे नैसर्गिक जलप्रवाहाला अडथळा येत असल्याचा आक्षेप घेत स्वंयसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. या याचिकेवर हरित लवादाने मागील महिन्यात अंतिम निर्णय देत 15 दिवसांच्या आत पालिकेने रस्त्यासाठी नदीपात्रात बांधलेली रिटेनिंग वॉल तसेच टाकण्यात आलेला राडारोडा काढण्याचे आदेश महापालिका आणि पाटबंधारे विभागाला होते. त्यानंत़र ही भिंत काढल्यास विठठलवाडी परिसरात पुन्हा पूर येण्याची तसेच सिंहगड रस्त्यास पर्यायी रस्ता म्हणून हा रस्ता आवश्यक असल्याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय पालिकेने घेतला त्यासाठी विधीतज्ज्ञ कपील सिब्बल यांच्या मार्फत याचिका दाखल करून हरीत लवादाच्या निर्णयास स्थगिती देण्याची मागणी केली. मात्र, न्यायालयाने त्यास नकार दिला. मात्र, हा रस्ता काढण्यासाठी पालिकेस या कामासाठी आणखी तीन महिन्यांची मुदतवाढही देण्यात आली आहे. त्यानुसार, हे काम मोठया स्वरूपाचे असल्याने तसेच वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याने स्वतंत्र ठेकेदार नेमून ते करून घेण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रीया राबविण्यास प्रशासनाकडून सुरूवात करण्यात आली असून ती येत्या काही दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे.================मनसेची रस्त्याला श्रध्दांजली पर्यावरणाचा समतोल राखून पालिकेने हा रस्ता मार्गी लावणे आवश्यक होते. मात्र, आता तो उखडून टाकावा लागणार असल्याने शेकडे नागरिकांना फटका बसणार आहे. त्याचा निषेध करण्यासाठी मनसेने मंगळवारी संतोष हॉल चौकात या रस्त्यास श्रध्दांजली वाहून अनोखे आंदोलन करण्यात आले. नगरसेवक राजेंद्र लायगुडे, नगरसेविका युगंधरा चाकणकर, मनसेचे विकास दांगट,विरेंद्र सौदाने, प्रशांत लगड, संजय पायगुडे यावेळी उपस्थित होते.----------------आणखी एक चौकट आहे...