रेल्वे तिकीट दलालांवर कारवाई करा
By admin | Updated: June 6, 2014 23:44 IST
नागपूर : उन्हाळ्यात बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. उन्हाळा असल्यामुळे रेल्वेच्या प्रवासाला प्रवाशांची पहिली पसंती असते. त्यामुळे रेल्वे तिकिटांच्या आरक्षणासाठी सकाळपासून आरक्षण काऊंटरवर लोकांच्या रांगा लागलेल्या दिसतात. रेल्वे प्रवासाकडे लोकांचा वाढता कल लक्षात घेता, तिकिटांवर दलाली कमाविणारे दलाल सक्रिय झाले आहे. प्रवाशांच्या रांगेत उभे राहून, प्रवाशांना धक्काबुक्की करून हे दलाल तिकिटे मिळवित आहेत. या दलालांसोबत आरपीएफ व आरक्षण काऊंटरच्या कर्मचाऱ्यांची साठगाठ असल्याने, गरजवंताना आरक्षित तिकिटे न मिळता, दलालांचे चांगलेच फावत आहे. या दलालांना आरक्षण काऊंटवरून हद्दपार करा, त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रवादी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अजय पाटील यांनी पत्रपरिषदेत केली. यावेळी राजेश कुंभलकर, प्रगती पाटील,
रेल्वे तिकीट दलालांवर कारवाई करा
नागपूर : उन्हाळ्यात बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. उन्हाळा असल्यामुळे रेल्वेच्या प्रवासाला प्रवाशांची पहिली पसंती असते. त्यामुळे रेल्वे तिकिटांच्या आरक्षणासाठी सकाळपासून आरक्षण काऊंटरवर लोकांच्या रांगा लागलेल्या दिसतात. रेल्वे प्रवासाकडे लोकांचा वाढता कल लक्षात घेता, तिकिटांवर दलाली कमाविणारे दलाल सक्रिय झाले आहे. प्रवाशांच्या रांगेत उभे राहून, प्रवाशांना धक्काबुक्की करून हे दलाल तिकिटे मिळवित आहेत. या दलालांसोबत आरपीएफ व आरक्षण काऊंटरच्या कर्मचाऱ्यांची साठगाठ असल्याने, गरजवंताना आरक्षित तिकिटे न मिळता, दलालांचे चांगलेच फावत आहे. या दलालांना आरक्षण काऊंटवरून हद्दपार करा, त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रवादी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अजय पाटील यांनी पत्रपरिषदेत केली. यावेळी राजेश कुंभलकर, प्रगती पाटील, महेंद्र भांगे, तनुज चौबे आदी उपस्थित होते.