सारांश
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
गीता परदेशी यांना पुरस्कार
सारांश
गीता परदेशी यांना पुरस्कारपुणे : बुधवार पेठेतील देवदासी भगिनींमध्ये क्षयरोग निवारणाच्या कार्यासाठी दिला जाणारा डॉ. पूजा यादव स्मृती पुरस्कार गीता परदेशी यांना प्रदान करण्यात आला. अखिल बुधवार पेठ देवदासी संस्थेतर्फे यावेळी परदेशी यांना रोख रक्कम, मानपत्र व स्मृतीचिन्ह अशा पुरस्कार देण्यात आला. यावेळी परिष्ठ पोलिस निरीक्षक रेखा साळुंखे, पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यासाचे विश्वस्त डॉ. मिलींद भोई, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त अरविंद पाटील, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, सामाजिक कार्यकर्त्या मदिना तांबोळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. प्रकाश यादव यांनी केले होते. वाहतूक समस्येवर जनजागृती पुणे -पुण्यात वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात असून त्यासंदर्भात जनजागृती व शाळेतील विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम सांगण्यासाठी पवार पब्लिक स्कूल शाळेच्या वतीने ट्रॅफिक सेल्सची माहिती देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया अँटी करप्शन कमिटीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अभिजीतराजे देशमुख तसेच ट्रॅफीक डिव्हीजनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एच.जी.काळे उपस्थित होते. यावेळी मुलांना अपघात टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी असे सांगण्यात आले. गाडी चालवताना मोबाईल वापरण्याचे तोटे, हेल्मेट न वापरण्याचे तोटे यांविषयीही माहिती देण्यात आली. यावेळी मुलांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. शाळेच्या प्राचार्या डॉ. अंजली गुर्जर यांवेळी उपस्थित होत्या.