शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

असा आहे सिंधू करार

By admin | Updated: September 27, 2016 01:49 IST

भारतातील राज्यांराज्यांतून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कसे वाटून घ्यायचे, याचा कटुता न येता निर्णय कसा घ्यावा हे ठरत नव्हते, तेव्हापासून कायद्याच्या चौकटीत पाण्याचे स्रोत कसे

भारतातील राज्यांराज्यांतून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कसे वाटून घ्यायचे, याचा कटुता न येता निर्णय कसा घ्यावा हे ठरत नव्हते, तेव्हापासून कायद्याच्या चौकटीत पाण्याचे स्रोत कसे वापरावेत, याचे भारत व पाकिस्तान हे जिवंत उदाहरण आहे. भारत आणि पाकिस्तान गेल्या ५६ वर्षांपासून सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांचे पाणी शांतपणे वापरत आहेत. त्याचे श्रेय या कराराला आहे. सिंधु नदी पाणी वाटप करारावर १९ सप्टेंबर १९६० रोजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान अय्युब खान यांनी स्वाक्षऱ्या केल्या.हा करार जागतिक बँकेने घडवून आणला होता.या दोन्ही देशांतून वाहणारी सिंधु नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याचा वापर दोन्ही देशांनी कसा करावा याचे प्रशासन हा करार करतो.करारानुसार रावी, बियास आणि सतलज नद्यांचे नियंत्रण भारताकडे तर पाकिस्तानकडे सिंधु, चिनाब व झेलम नद्यांचे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात फाळणी झाल्यापासून अनेक मुद्द्यांवर वितुष्ट असले तरी सिंधूच्या पाण्यावरून कोणताही संघर्ष झालेला नाही, पण आता दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा ही चर्चा सुरू झाली.सिंधु नदी भारतातून वाहत असल्यामुळे तिचे २० टक्के पाणी सिंचन, वीज निर्मिती व वाहतुकीच्या कामांसाठी वापरण्यास परवानगी आहे.कराराची अमलबजावणी व व्यवस्थापन करण्यासाठी स्थायी सिंधु आयोगाची द्विपक्षीय आयोग म्हणून स्थापना करण्यात आलेली आहे. पाणी वाटपावरून उद््भवणारे वाद या आयोगामार्फत दूर केले जातात. वादांची सोडवणूक मित्रत्वाने होण्यासाठी हा करार लवाद व्यवस्थाही उपलब्ध करून देतो.सिंधू मुळात तिबेटमधून (चीन) उगम पावत असली तरी या करारात चीन नाही. जर चीनने या नदीचा प्रवाह बदलण्याचा किंवा थांबविण्याचा निर्णय घेतला तर भारत आणि पाकिस्तानच्या हितावर परिणाम होईल.तिबेटच्या पठारावरील बर्फ हवामान बदलामुळे वितळत आहे व शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार त्यामुळे भविष्यात नदीवर परिणाम होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात फाळणी झाल्यापासून अनेक मुद्यांवर वितुष्ट असले तरी या कराराला मान्यता मिळाल्यापासून पाण्यावरून कोणताही संघर्ष झालेला नाही, हे येथे लक्षात घ्यावे.