शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक : दोन वर्षांत गुजरातेत १८४ सिंहांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 01:55 IST

गुजरातमध्ये २०१६ व २०१७मध्ये १८४ सिंहांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. मात्र त्यातील बहुसंख्य मृत्यू हे नैसर्गिक कारणांनी झाले असल्याचा दावा राज्य सरकारने विधानसभेत केला आहे.

अहमदाबाद -  गुजरातमध्ये २०१६ व २०१७मध्ये १८४ सिंहांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. मात्र त्यातील बहुसंख्य मृत्यू हे नैसर्गिक कारणांनी झाले असल्याचा दावा राज्य सरकारने विधानसभेत केला आहे.गुजरातमध्ये २०१५मध्ये करण्यात आलेल्या गणनेमध्ये तिथे ५२३ सिंह असल्याचे स्पष्ट झाले होते. दोन वर्षांच्या आकडेवारीतून हे दिसते की दरवर्षी एकूण सिंहांपैकी १८ टक्के मरण पावतात. सिंहांची संख्या ज्या दराने वाढत आहे, त्याच्या तुलनेत मृत्यू दर हा सामान्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सिंहांच्या मृत्यूचा दर विचारात घेतला तर सिंहांच्या संख्येत दरवर्षी दोन टक्के वाढ होत आहे.सिंहाचे 100 छावे जन्माला आले तर वयाच्या तीन वर्षांपर्यंत त्यातील फक्त 36 जगतात.सिंहांच्या मृत्यूमध्ये तीन वर्षांच्या आतील छाव्यांच्या मृत्यूचे प्रमाण हे जास्त आहे. तिथे २०१६मध्ये १२ सिंहांचा अनैसर्गिक मृत्यू झाला होता व त्या वर्षी मरण पावलेल्या एकूण सिंहांमध्ये हे प्रमाण १२ टक्के होते. तथापि, २०१७मध्ये सिंहांच्या अनैसर्गिक मृत्यूंचे प्रमाण एकदम २५ टक्क्यांवर गेले. त्या वर्षी ८० सिंह मरण पावले त्यात २० सिंहांचा मृत्यू अनैसर्गिक होता.दोन महिन्यांत 106 बिबट्यांचा मृत्यूदेशात या वर्षीच्या पहिल्या दोन महिन्यांतच तब्बल १०६ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन सोसायटी आॅफ इंडियाने गोळा केलेल्या माहितीनुसार, यातील बहुतेक मृत्यू हे शिकारीमुळे झाले आहेत.२०१७मध्ये ४३१ बिबटे मरण पावले होते. त्यापैकी १५९ शिकारीचे बळी होते. त्याआधी २०१६मध्ये ४५० बिबिटे मरण पावले, त्यातील १२७ बिबट्यांचा मृत्यू शिकारीत झाला होता.बिबट्याची कातडी व शरीराचे इतर अवयव ज्या पद्धतीने गायब झाले होते, त्यावरून हे स्पष्ट झाले. फक्त १२ बिबटेच नैसर्गिक कारणांनी मरण पावले. सगळ्यात जास्त बिबटे (२४) उत्तराखंडमध्ये मरण पावले. त्याखालोखाल महाराष्ट्रात १८ व राजस्थानात ११ बिबट्यांचा मृत्यू झाला. १८ राज्यांतून बिबट्यांच्या मृत्यूची माहिती घेण्यात आली.

टॅग्स :Gujaratगुजरातnewsबातम्या