शीना बोरा - पॅकेज जोड
By admin | Updated: September 6, 2015 23:54 IST
इंद्राणीसह तिघांची पुन्हा
शीना बोरा - पॅकेज जोड
इंद्राणीसह तिघांची पुन्हावांद्रे कॉलेज ते वरळीपर्यंत परेड- फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आज मिळणारमुंबई : शीना बोरा हत्याप्रकरणातील इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि श्याम राय यांना या घटनेशी संबंधित विविध ठिकाणी फिरवून त्याबाबत विचारणा करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पेण येथे मृतदेह पुरलेल्या ठिकाणची माती आणि सांगाड्याच्या डीएनए नमुन्याचे अहवाल सोमवारी फॉरेन्सिक लॅबकडून पोलिसांना मिळणार आहेत. आतापर्यंत १८पैकी ८ चाचण्यांचे रिपोर्ट शीनाशी मिळतेजुळते असून सोमवारच्या अहवालातून एखादी बाब तपासाला पूरक ठरल्यास मृतदेह शीनाचा असल्याचे स्पष्ट होईल, असे अधिकार्यांकडून सांगण्यात आले.............................................कोलकात्यात आणखी एकाकडे चौकशी आरोपींना सहाय्य केल्याच्या संशयावरून कोलकात्यातील एका व्यक्तीला चौकशीसाठी पाचारण केले आहे. आरोपींच्या मोबाईल रेकॉर्डमध्ये या व्यक्तीचा नंबर आढळल्याने ही चौकशी करण्यात येत असल्याचे अधिकार्याकडून सांगण्यात आले.