समाविष्ट गावांसाठी स्वतंत्र महापालिकांचा प्रस्ताव वगळला
By admin | Updated: August 7, 2015 00:06 IST
पुणे : महापालिकेमध्ये समावेश करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या गावांसाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करण्यात यावी असा नगरसेवक संजय बालगुडे व मुकारी अलगुडे यांनी महापालिकेच्या प्रस्ताव वगळण्याचा निर्णय मुख्यसभेने घेतला.
समाविष्ट गावांसाठी स्वतंत्र महापालिकांचा प्रस्ताव वगळला
पुणे : महापालिकेमध्ये समावेश करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या गावांसाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करण्यात यावी असा नगरसेवक संजय बालगुडे व मुकारी अलगुडे यांनी महापालिकेच्या प्रस्ताव वगळण्याचा निर्णय मुख्यसभेने घेतला.महापालिकेमध्ये लगतच्या गावांचा समावेश केल्यामुळे शहराची भौगोलिकदृष्टया मोठयाप्रमाणात वाढ होणार आहे, शहरालगतच्या गावांचा विकास योग्य रितीने होणे आवश्यक आहे. या गावामध्ये राहणार्या नागरिकांना चांगल्या व उत्तमरित्या नागरी सुविधाही उपलब्ध होणे गरजेचे आहे. परंतू शहराची भौगोलिक वाढ विचारात घेतली तर या सोयी सुविधा आपण पुरवू शकू का याचाही विचार होणे आवश्यक आहे. भौगोलिक क्षेत्रफळ जेवढे कमी असेल तर चांगल्या प्रकारे प्रशासकीय कारभार होऊ शकेलव त्यावर नियंत्रण राहू शकेल. पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेवर मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. समाविष्ट गावांचा सर्वार्थाने विकास करण्यासाठी २५ हजार कोटी रूपये लागणार आहेत. आज अंदाजपत्रकामध्ये प्रतिवर्षी तुट येत असताना हे शक्य नाही. त्यामुळे महापालिकेत नव्याने समाविष्ट होणार्या गावांची स्वतंत्र महापालिका स्थापन करण्यात यावी असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मुख्यसभेत हा प्रस्ताव पुकारल्यानंतर त्याला कोणाकडूनही अनुमोदन न मिळाल्याने तो वगळण्यात आला.