शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

आर.आर. आबांच्या निधनाने हळहळले श्रीगोंदेकर

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

श्रीगोंदा : राष्ट्रवादीची मुलूख मैदानी तोफ असलेले आर.आर. पाटील (आबा) यांच्या निधनाने श्रीगोंद्यातील राजकीय नेत्यांपासून सामान्य माणसाला दु:खाचा धक्का बसला आहे.

श्रीगोंदा : राष्ट्रवादीची मुलूख मैदानी तोफ असलेले आर.आर. पाटील (आबा) यांच्या निधनाने श्रीगोंद्यातील राजकीय नेत्यांपासून सामान्य माणसाला दु:खाचा धक्का बसला आहे.
आर.आर. पाटलांनी श्रीगोंदा, काष्टी, देवदैठण येथील सभा गाजविल्या. साईकृपा साखर कारखान्याची मोळी टाकण्यापासून काष्टीचे मदन गडदे यांच्या मेडिकलचे उद्घाटन अन् चांभुर्डीचे निवास नाईक सारख्या लहान कार्यकर्त्याच्या लग्नाला हजेरी लावून श्रीगोंदेकरांचा विश्वास संपादन केला होता.
श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय शोकसभा झाली. या सभेत आख्तार शेख, बापू गोरे, ॲड. संभाजी बोरूडे, बाळासाहेब शेलार आदी मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. (तालुका प्रतिनिधी)

सच्चा मित्र हरपला
आर.आर. पाटलांबरोबर १९९० पासून विधानसभेत काम केले. उत्कृष्ट संसदपटू आणि विचारावर ठाम असलेला एक सच्चा मित्र हरपला. वसंतदादा पाटलांच्या तालमीत तयार झालेल्या आबांनी पवार साहेबांबरोबर शेवटपर्यंत निष्ठेने काम केले. एका सच्च्या मित्राला विनम्र अभिवादन.
-बबनराव पाचपुते, माजी मंत्री

आर.आर. पाटील यांनी तंटामुक्ती व ग्रामस्वच्छता अभियान सारखे महत्त्वाचे निर्णय घेतले आणि उभ्या महाराष्ट्रात स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हणून छाप निर्माण केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.
-राहुल जगताप, आमदार

जातीयवादी शक्तींच्या विरोधात लढा
आर.आर. पाटलांनी आयुष्यभर जातीयवादी शक्तींच्या विरोधात दिलेला लढा आणि विधानसभेत केलेले काम, भाषणे याची महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होणार आहे.
-शिवाजीराव नागवडे, माजी आमदार

साहेबांची पाठराखण
एक नि:स्वार्थी, निगर्वी, राष्ट्रवादीचा एक निर्मळ चेहरा असलेल्या आर.आर. पाटलांच्या निधनाने मनाला धक्का बसला. त्यांनी पवारसाहेबांची अडचणीच्या काळात पाठराखण केली.
-घनश्याम शेलार, प्रदेश उपाध्यक्ष, राकाँ.