मदतीच्या बहाण्याने दोघा युवकांची लूट
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
नाशिक : तुम्हा दोघांना मारण्याची सुपारी दिली असून, कीव आल्यामुळे मी तुम्हाला वाचविण्यासाठी आल्याचे सांगून त्यांच्याकडील मोबाइल व रोकडची लूट केल्याची घटना सोमवारी सकाळी गोळे कॉलनीत घडली़ इंदिरानगर येथील सिद्धेश संतोष मुळे हे गुरुवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मित्रासमवेत उभे होते़ त्यावेळी तेथे आलेल्या संशयिताने सुपारीची बतावणी करून या दोघांना रिक्षामध्ये (एमएच १५, झेड ८२९२) बसवून पंचवटी येथील मार्के ट यार्डमध्ये नेले़ या ठिकाणी दमबाजी करून त्यांच्याजवळील मोबाइल व रोकड असा २१ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने काढून घेतला़ याप्रकरणी मुळे यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)