वीज वारंवार खंडीत
By admin | Updated: August 13, 2015 23:24 IST
पणजी व परिसरात
वीज वारंवार खंडीत
पणजी व परिसरातवीज खंडितपणजी : राजधानी पणजीतील अनेक भागांमध्ये व परिसरात गुरुवारी दिवसभर वीजपुरवठा वारंवार खंडित झाला. जुनेगोवेहून पणजीत येणार्या वीजवाहिनीमध्ये मोठा बिघाड झाल्याने गुरुवारी पहाटे वीजपुरवठय़ाबाबत समस्या निर्माण झाली. वीज खात्याची यंत्रणा पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत काम करत होती. तथापि, वीज खात्याने पणजी व परिसरात लोड शेडिंग केले. त्यामुळे पणजी मार्केट व अन्य काही भागांमध्ये विजेचा लपंडाव सुरू राहिला. अनेक आस्थापनांना याचा मोठा त्रास झाला. पणजीच्या शेजारील ताळगाव मतदारसंघात तर अनेकदा वारंवार वीजपुरवठय़ाची समस्या निर्माण होत आहे. (प्रतिनिधी)