शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

ममता बॅनर्जींना खरा धोका ‘एम’ फॅक्टरचा

By admin | Updated: May 14, 2014 04:01 IST

ममता बॅनर्जी निश्चिंत होत्या, ३२ नाहीतर ३० जागा तरी कुठे गेल्या नाहीत या हवेत तृणमूल काँग्रेस होती. सुरुवातला हवाही तशीच होती.

दिलीप तिखिले, कोलकाता-

ममता बॅनर्जी निश्चिंत होत्या, ३२ नाहीतर ३० जागा तरी कुठे गेल्या नाहीत या हवेत तृणमूल काँग्रेस होती. सुरुवातला हवाही तशीच होती. पण ‘एम’ नावाचे वादळ प. बंगालात शिरले आणि ममतांच्या बुरुजांना हादरे बसू लागले. तृणमूलच काय माकप आणि काँग्रेसलाही या वादळाचे तडाखे जाणवू लागले. प. बंगालात मोदी फॅक्टर चालणार नाही असेच ममतांसह सर्वांना वाटत होते. त्यामुळेच सुरुवातीला मोदींनी पुढे केलेला सहकार्याचा हात ममता बॅनर्जींनी झिडकारून लावला. निवडणुकीचे वातावरण जसजसे तापू लागले तसे मोदींचे प. बंगालचे दौरेही वाढू लागले. ममतांनी केलेली संभावना जिव्हारी लागलेल्या मोदींनी मग तृणमूल काँगे्रसलाच लक्ष्य करून ममतांना पुरते घायाळ केले. वास्तविक पाहता शारदा चिटफंड, पोर्टेट आदी मुद्दे जुनेच होते. २०११ च्या विधानसभा निवडणुकीत व नंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या मुद्यांचा काही एक परिणाम न होता तृणमूल काँग्रेसने प्रभावी कामगिरी केली होती. पण यावेळी नरेंद्र मोदींनी हे घोटाळे अतिशय प्रभावीपणे जनतेपुढे ठेवल्याने ममता मोठ्या अडचणीत आल्या आणि त्यांच्या प्रचाराचा बहुतांश भाग सारवासारव करण्यातच गेला. मतदानाचा शेवटच्या दोन टप्प्यात तर राज्यात असे चित्र निर्माण झाले की, यावेळी लढत केवळ भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातच आहे. काँग्रेस आणि माकप प्रचारात बॅकफ्रूटवरच राहिली. आजवर राज्यात भाजपा कधीही आक्रमक नव्हती पण मोदींच्या उपस्थितीमुळे प्रदेश भाजपात चैतन्य निर्माण झाले. मतदारांवरही त्याचा प्रभाव जाणवला. १६ मे च्या निकालात त्याचे प्रतिबिंब निश्चितच दिसेल. गेल्या निवडणुकीत भाजपाला एकमेव दार्जिलिंगची जागा मिळाली. यात यावेळी किमान दोन जागांची भर पडू शकते. गेल्या निवडणुकीत भाजपाचे जे ५ ते ६% मताधिक्य होते ते यावेळी १२ ते १५ टक्क्यावर जाईल असा अंदाज आहे. काही ठिकाणी तर २० ते ३० टक्के मताधिक्य भाजपाला मिळेल अशी स्थिती आहे. तृणमूलच्या गेल्या निवडणुकीत १९ जागा होत्या यावेळी फारतर तीन ते चार जागांची भर पडू शकते. शिवाय अनेक ठिकाणी या पक्षाच्या मताधिक्यात मोठी घट शक्य आहे. गेल्यावेळी या पक्षाला राज्यात ४१ टक्के तर डाव्या पक्षाला ३८% मते मिळाली होती. तृणमूलच्या मताधिक्यातील काँग्रेसची मते कमी केली तर डाव्यांचे मताधिक्य अधिक होते. यावेळी मोदी हवेचा फटका तृणमूला बसू शकतो. त्यामुळे यावेळी ममताची घसरगुंडी निश्चित मानली जात आहे. काँग्रेसला सहा जागा कायम राखणे अवघड जाणार आहे. त्यांची जांगीपूरची एक जागा अडचणीत आहे. राष्टÑपती मुखर्जी यांचे पुत्र अभिजित मुखर्जी काठावर आहेत. डावी आघाडी २०११ च्या पराभवातून अद्याप सावरलेली नाही. भाजपाच्या प्रभावाचा फायदा मिळून यावेळी ही आघाडी २००९ ची स्थिती कायम राखू शकेल असा अंदाज आहे.