(वाचली) राज्यातील गडकोट संवर्धनास निधी देण्याची मागणी *शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
कोल्हापूर : राज्यातील गडकोट व ऐतिहासिक दुर्गांचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन त्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी येथील शिवदुर्ग संवर्धन आंदोलन या संघटनेने जिल्हाधिकार्यांकडे केली. मागणीचे हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी स्वीकारले.
(वाचली) राज्यातील गडकोट संवर्धनास निधी देण्याची मागणी *शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
कोल्हापूर : राज्यातील गडकोट व ऐतिहासिक दुर्गांचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन त्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी येथील शिवदुर्ग संवर्धन आंदोलन या संघटनेने जिल्हाधिकार्यांकडे केली. मागणीचे हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी स्वीकारले. राज्यातील गडकोट व दुर्गांच्या साहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. राजगड, रायगड, पुरंदर, सिंहगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग हे गड म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेतील एक महत्त्वाचे साक्षीदार आहेत. परंतु, दुर्दैवाने आज या गडकोट, दुर्गांची अवस्था वाईट झाली आहे. त्याच्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. तटबंदी, बुरुज ढासळत आहेत. म्हणूनच आता राज्य सरकारने पुढाकार घेऊन त्यांच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला पाहिजे. यासह गडकोट मंदिरांची राष्ट्रीय संरक्षक वास्तू म्हणून नोंद करावी, राजगड, रायगड संवर्धनासाठी स्वतंत्र प्राधिकरण करावे, सर्व गडांवर मद्यपानासाठी बंदी करावी, बेकायदेशीर बांधकामे पाडून टाकावीत, आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. निवासी उपजिल्हाधिकार्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात हर्षल सुर्वे, इंद्रजित सावंत, वसंत मुळीक, किरण चव्हाण, अमित अडसुळे, चैतन्य अष्टेकर, सुहास चौगुले, सागर पाटील, आदींचा समावेश होता.