नवी दिल्ली : माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांना त्यांच्या ७१ व्या जयंतीनिमित्त गुरुवारी संपूर्ण राष्ट्राने आदरांजली अर्पण केली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती डॉ. हामीद अन्सारी यांच्यासह अन्य नेत्यांनी राजीवजींना आदरांजली अर्पण केली.मुखर्जी, अन्सारी यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वड्रा आदींनी राजीव गांधींच्या वीरभूमी या समाधीस्थळी जाऊन पुष्पांजली अर्पण केली. पंतप्रधान मोदी यांनीही टिष्ट्वटरवरून राजीव गांधींना आदरांजली अर्पण केली. ‘भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी विनम्र आदरांजली अर्पण करतो,’ असे मोदी यांनी म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
राजीव गांधींना राष्ट्राची आदरांजली
By admin | Updated: August 21, 2015 00:13 IST