शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती निवडणुकीचे मतदान १७ जुलै रोजी

By admin | Updated: June 8, 2017 06:53 IST

भारतीय प्रजासत्ताकाचे १५वे राष्ट्रपती निवडण्यासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केला

(लोकमत न्यूज नेटवर्क)नवी दिल्ली : भारतीय प्रजासत्ताकाचे १५वे राष्ट्रपती निवडण्यासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केला. त्यानुसार या निवडणुकीचे मतदान १७ जुलै रोजी होईल व गरज पडल्यास २० जुलै रोजी मतमोजणी होईल.विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुदत २४ जुलै रोजी संपत आहे. त्याआधी एक आठवडा किंवा चार दिवस आधी मुखर्जी यांचा उत्तराधिकारी म्हणून देशाच्या या सर्वोच्चपदावर पुढील पाच वर्षे कोण बसेल हे स्पष्ट होईल. एकाहून जास्त उमेदवार रिंगणात नसतील, तर १ जुलै रोजीच नव्या राष्ट्रपतीचे नाव समोर येईल.लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य तसेच सर्व राज्ये आणि दिल्ली व पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे सदस्य या निवडणुकीसाठी मतदार असतील, यात संसद व विधानसभांमधील नामनिदर्शित सदस्यांचा समावेश नसेल. तसेच राज्य विधान परिषदांच्या सदस्यांनाही मतदानाचा अधिकार नसेल.आयोगाने या निवडणुकीसाठी लोकसभा सचिवालयाचे महासचिव अनूप मिश्रा यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. याखेरीज प्रत्येक राज्यात एक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नेमला गेला आहे. महाराष्ट्रात राज्य विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. ए. एन. कळसे व उपसचिव आर. जे. कुडतरकर हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतील.मतदान १७ जुलै रोजी स. १० ते सा. ५ या वेळात होईल. दिल्लीत संसद भवनाच्या खोली क्र. ६७ मध्ये लोकसभा व राज्यसभा सदस्य मतदान करू शकतील. मुंबईत विधान भवनाच्या चौथ्या मजल्यावरील सेंट्रल हॉलमध्ये मतदान होईल. मतदान गुप्त मतदान पद्धतीने होईल. अपवादात्मक परिस्थितीत व पूर्वसूचना देऊन संसद सदस्य राज्यांमध्ये किंवा राज्य विधानसभांचे सदस्य दिल्लीमध्ये मतदान करू शकतील.निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या प्रत्येक उमेदवाराच्या अर्जावर किमान ५० सूचक व किमान पाच अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्या लागतील. मतदार असलेले आमदार, खासदार सूचक व अनुमोदक असू शकतील. एकाहून अधिक उमेदवारांच्या अर्जांवर सूचक व अनुमोदकांच्या सामायिक स्वाक्षऱ्या असतील तर त्यापैकी जो अर्ज आधी दाखल होईल त्यावरील स्वाक्षऱ्या ग्राह्य धरल्या जातील. प्रत्येक उमेदवारी अर्ज फक्त दिल्लीतच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करावा लागेल.

निवडणूक कार्यक्रमअधिसूचना : १७ जूनउमेदवारी अर्जासाठी अखेरचा दिवस : २८ जूनअर्जांची छाननी : २९ जूनमाघार घेण्यासाठी : १ जुलैमतदानाचा दिवस : १७ जुलैमतमोजणी : २० जुलैमतदानासाठी खास पेन मतदारांना मतपत्रिकेवर पसंतीची खूण करण्यासाठी आयोगाकडून खास पेन दिले जाईल व त्याच पेनाचा वापर करून त्यांना मतदान करावे लागेल. अन्य पेन वापरून मतदान केल्यास ते मत बाद ठरविले जाईल. मतदाराला मतदान कक्षात जाताना हे पेन उपलब्ध करून दिले जाईल, असे मुख्य निवडणक आयुक्त डॉ. नसिम झैदी यांनी सांगितले.