औरंगाबाद : आज दुसर्या दिवशीही जिल्हा पुरवठा खात्याने मुकुंदवाडी, बजरंग चौक, एमआयडीसी आणि नव्या मोंढ्यातील डाळींची दुकाने व गोदामांची तपासणी केली. दिवसेंदिवस डाळींचे भाव वाढत आहेत. हरभरा डाळ १४० ते १५० रु. किलो तर तूर डाळ १३० रु. किलो दराने विकली जात आहे. पुरवठा विभागाने शहरासह जिल्ह्यातील होलसेल दुकाने व गोदामातील साठ्यांची तपासणी करण्यासाठी पथके नेमली आहेत. तपासणी अधिकारी एम. बी. वाणी आणि पुरवठा निरीक्षक संतोष अनर्थे यांच्यातर्फे ही तपासणी होत आहे.
डाळींच्या दुकान व गोदामांची तपासणी चालूच ( अर्जंट)डबल बातमी
By admin | Updated: October 22, 2016 00:50 IST