शाळकरी मुलांच्या रिक्षाला कट मारून पोलीस स्टेशनची कमान तोडली मद्यपी ट्रकचालकाचा प्रताप : महामार्गावर पाठलाग करून पकडले वाहतूक पोलिसांनी
By admin | Updated: October 22, 2016 22:22 IST
जळगाव: दारुच्या नशेत भरधाव वेगाने ट्रक चालवून शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या तीन रिक्षांना तसेच चार चाकी वाहनाला कट मारून पळणार्या ट्रक चालकाला वाहतूक पोलिसांनी पाठलाग करून पकडले. नंतर त्याला जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याने ट्रक आतमध्ये घुसवतांना पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वाराची कमान व सिमेंटचे पीलरही तोडले. ही घटना शनिवारी दुपारी घडली.
शाळकरी मुलांच्या रिक्षाला कट मारून पोलीस स्टेशनची कमान तोडली मद्यपी ट्रकचालकाचा प्रताप : महामार्गावर पाठलाग करून पकडले वाहतूक पोलिसांनी
जळगाव: दारुच्या नशेत भरधाव वेगाने ट्रक चालवून शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या तीन रिक्षांना तसेच चार चाकी वाहनाला कट मारून पळणार्या ट्रक चालकाला वाहतूक पोलिसांनी पाठलाग करून पकडले. नंतर त्याला जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याने ट्रक आतमध्ये घुसवतांना पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वाराची कमान व सिमेंटचे पीलरही तोडले. ही घटना शनिवारी दुपारी घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, प्रभु महादम गिरी (वय २८ रा.सादीपुर ता.गौर्याकाठी जि.मिनान, बिहार) हा भारत नगर सुरत येथून कोलकाता येथे ट्रकने (क्र.डब्लु.बी.२३ सी.११५६) कापड नेत होता. यावेळी तो दारुच्या नशेत तर्रर होता.शनिवारी दुपारी गुजराल पेट्रोल पंपाजवळ त्याने शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या तीन रिक्षांना कट मारला. हा प्रकार एका चार चाकी वाहन चालकाच्या लक्षात आला. त्याने चौकात बंदोबस्ताला असलेले मुक्तारअली वजीर अली व दीपक शिरसाठ या वाहतूक पोलिसांना सांगितला. दोन्ही पोलिसांनी त्यांच्या वाहनात बसून ट्रकचा पाठलाग केला असता त्यांनाही त्याने कट मारला. शेवटी शासकीय आयटीआयजवळ हा ट्रक अडविण्यात आला. यंत्राद्वारे केली तपासणीमहामार्गावरून हा ट्रक वाहतूक शाखेत आणला असता तेथे यंत्राद्वारे चालकाची तपासणी करण्यात आली, नंतर वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. दोन्ही तपासणीत त्याने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्यावर ड्रंक ॲँड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली. नंतर ट्रकसह त्याला जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नेण्यात आले. तेथे आतमध्ये ट्रक नेत असताना त्यात पोलीस ठाण्याची कमान व सिमेंटचे पिलरच त्याने उडविले. या प्रकारामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. संध्याकाळपर्यंत कमान व सिमेंटचे तुकडे पडून होते.