पान १/ नितीन गडकरींना दंड
By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST
नितीन गडकरींना
पान १/ नितीन गडकरींना दंड
नितीन गडकरींना१० हजारांचा दंडनवी दिल्ली : दिल्लीच्या एका न्यायालयाने मानहानीच्या एका खटल्यात न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना १० हजारांचा दंड ठोठावला. महानगर दंडाधिकारी गोमती मनोचा यांनी, गडकरींनी सुनावणीच्या तीन दिवस आधी शपथपत्र दाखल करण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नव्हते, असे सांगितले. हे शपथपत्र केजरीवाल यांच्या वकिलांना तीन दिवसांपूर्वी देणे आवश्यक असताना ते शनिवारी दाखल करण्यात आल्याचे त्यांनी पुढे नमूद केले. दंडाधिकार्यांनी गडकरींवर १० हजारांचा दंड ठोठावला असून, या खटल्याची पुढील सुनावणी २४ मार्चला निश्चित केली आहे. गडकरींचे वकील पिंकी आनंद यांनी या शपथपत्राची प्रत १८ डिसेंबरला सादर केल्याचे सांगितले. मात्र, केजरीवालांच्या वकिलांनी ती त्यांना आज, शनिवारी मिळाल्याचे नमूद केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)