--------------------------(संदेश : हे वृत्त सेंट्रल डेस्कने टाकलेल्या तालिबानच्या १६ दहशतवाद्यांनी रचला होता हल्ल्याचा कट या बातमीसोबत घ्यावे.)-----------------------पाकच्या हवाई हल्ल्यांत५७ अतिरेकी ठारइस्लामाबाद : पाकिस्तानने खैबर आदिवासी प्रांतात हवाई हल्ले करून ५७ अतिरेक्यांना ठार मारले. या भागात आत्मघाती हल्लेखोरांना प्रशिक्षण दिले जाते.लष्कराने बुधवारी खैबर आदिवासी प्रांतातील तिराह खोर्यात २० हवाई हल्ले केले. हा भाग पेशावरला जवळ आहे, असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. पेशावर हत्याकांडात सहभागी असलेल्यांना खैबरच्या बारा भागात प्रशिक्षण दिले गेल्याचे समजल्यानंतर हे हल्ले करण्यात आले. पेशावरला लागून असलेल्या उत्तर वजिरीस्तान या आदिवासी भागात लष्कराने केलेल्या कारवाईचा सूड आम्ही शाळेवर हल्ला करून घेतला असल्याचा दावा तालिबानच्या प्रवक्त्याने केला होता. सरकारने शेकडो अतिरेक्यांना ठार मारले असले तरी त्यांचा पूर्ण पराभव झालेला नाही. हे अतिरेकी पहाडी भागात लपून बसतात आणि पाक सरकारचे हल्ले चुकविण्यासाठी अफगाणिस्तानात पळून जातात.
देश-परदेश- पाकिस्ताने ५७ ठार केले
By admin | Updated: December 19, 2014 00:55 IST